एक्स्प्लोर
बाहुबली-देवसेना पुन्हा एकत्र, नव्या सिनेमाचा टीझर रिलीज

मुंबई : 'बाहुबली 2' सिनेमातील देवसेना म्हणजे अनुष्का शेट्टी आणि बाहुबली म्हणजे प्रभास आणखी एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. 'द रिटर्न ऑफ रिबेल 2' या सिनेमातून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द रिटर्न ऑफ रिबेल 2' या सिनेमाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. मूळ तेलुगूतील हा सिनेमा हिंदीत लवकरच रिलीज होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाची मोठी उत्सुकता लागली आहे. पहिल्यांदाच तेलुगूत रिलीज झालेल्या या सिनेमाचं नाव 'बिल्ला' आहे. तेलुगू भाषेत हा सिनेमा सुपरहिट झाला होता. अनुष्का शेट्टी या सिनेमात एका वेगळ्याच भूमिकेत दिसली होती. तर प्रभास डबल रोलमध्ये होता. या दोघांशिवाय सिनेमात हंसिका मोटवानीही दिसणार आहे. पाहा सिनेमाचा टीझर :
आणखी वाचा























