![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Poonam Pandey : 'माझ्या परवानगीने तो शूट झाला होता,पण पोस्ट...', बाथरुममधील व्हिडिओ लीक झाल्यानंतर पूनम पांडेचा खुलासा, एक्स बॉयफ्रेंडवरही केले गंभीर आरोप
Poonam Pandey : बाथरुममधील व्हिडिओ लीक झाल्याबाबत पूनम पांडेने धक्कादायक खुलासा केला असून तिच्या एक्स बॉयफ्रेंडनेवरही तिने गंभीर आरोप केले आहेत.
![Poonam Pandey : 'माझ्या परवानगीने तो शूट झाला होता,पण पोस्ट...', बाथरुममधील व्हिडिओ लीक झाल्यानंतर पूनम पांडेचा खुलासा, एक्स बॉयफ्रेंडवरही केले गंभीर आरोप Poonam Pandey Revealed Boyfriend Leaking Her Bathroom Video Entertainment Bollywood latest update detail marathi news Poonam Pandey : 'माझ्या परवानगीने तो शूट झाला होता,पण पोस्ट...', बाथरुममधील व्हिडिओ लीक झाल्यानंतर पूनम पांडेचा खुलासा, एक्स बॉयफ्रेंडवरही केले गंभीर आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/18/36eb917d57dc1400048aa495db13ffdf1716056359752720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Poonam Pandey : आपल्या निधनाचा स्टंट केल्याने अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) ही काही दिवसांपासून बरीच चर्चेत आली होती. एका कर्करोगाच्या जाहिरातीसाठी पूनमने तिच्या निधनाचे वृत्त पसरवले. परंतु जेव्हा लोकांना खरी बातमी समजली, तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पूनम पांडे चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान यावेळी पूनम पांडेने तिच्या बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप केले आहेत. काही महिन्यांपूर्वी पूनम पांडेचा बाथरुममधला फोटो लीक झाला होता. त्यावर आता या अभिनेत्री स्पष्टीकरण दिलं आहे.
पूनम पांडेने नुकतीच 'हॉटरफ्लाय' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने याबाबत खुलासा केला आहे. तसेच तिने या व्हिडिओवरही भाष्य केलं आहे. पूनम पांडे ही तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बरीच चर्चेत असते. तिच्या पोस्टही बऱ्याच व्हायरल होत असतात. अनेक गोष्टींमुळे पूनम पांडे ही चर्चेत आली आहे.
एक्स बॉयफ्रेंडने लीक केला व्हिडिओ
या मुलाखतीमध्ये पूनमने तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिचा व्हिडिओ लीक केला असल्याचा खुलासा केला आहे. यावेळी ती म्हणाली की, मला ते अजूनही ते आठवतंय कारण मी ते कधीच विसरु शकणार नाही. तेव्हा आम्ही एकमेकांशी भांडलो होतो. पण त्यावेळी मला स्वत:ला वाचायलचं होतं. त्याने तिथला ट्रीमर उचलला आणि माझे केस ट्रिम करणार होता. मी कसं तरी त्याच्याकडून ट्रिमर हिसकावून घेतला. तेव्हा मी खोलीतून पळून गेले होते आणि रडत रडत घरी गेले. अर्थात तो व्हिडिओ माझ्या सहमतीने शूट झाला होता, पण तो पोस्ट माझ्या परवानगीशिवाय झाला होता. जेव्हा मी तिथून पळाले मी माझा फोन तिथेच विसरले. कारण तेव्हा मला स्वत:ला वाचवायचं होतं. मी घरी आले आणि माझ्या वडिलांना सगळं सांगितलं. माझे वडिल त्याच्याशी बोलले सुद्धा.
मला कधीच वाटलं नव्हतं की तो असं काही करेल - पूनम पांडे
त्यानंतर मीही त्याच्याशी बोलले. तेव्हा त्याने मला धमकी दिली. त्याने मला म्हटलं की, तू जर परत आली नाहीस तर मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करेन. त्यावर मी त्याला म्हटलं की मी नाही येणार. पण मला खरंच वाटलं नव्हतं की, तो असं काही करेल. कारण मला असं वाटलं की, इतक्या खालच्या पातळीवर कोणी उतरणार नाही. तू कितीही नालायक असलास तरीही तू इतकी तरी सभ्यता पाळशील की ती तुझी गर्लफ्रेंड आहे. त्याने तो पोस्ट केला. त्याने तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरही मी विचार केला की, मी ह्याच्यासोबत शांतेत बोलेन, त्याला शांत करेन कारण मला दुसऱा कोणताही गोंधळ करायचा नव्हता. मला माघारी फिरावं लागणार होतं. कारण तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचं त्याचे मित्र कौतुक करत होते, पण माझ्याविषयी सगळं वाईट साईट बोललं जात होतं. मला एक वेळतर स्वत:ला संपवून टाकण्याचाही विचार आला होता, असंही पूनम पांडेने यावेळी म्हटलं.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)