Amruta Khanvilkar : 'तू नेहमी आई आणि बहिणीसोबतच फिरते, नवरा कुठेच नसतो'; चाहत्यांचा अमृताला प्रश्न, अभिनेत्रीनेही दिलं योग्य उत्तर
Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर ही सध्या लंडनमध्ये सुट्टीची मज्जा घेत असून ती तिच्या आईसोबत गेली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी तुझा नवरा कुठेय असा प्रश्न विचारला.
![Amruta Khanvilkar : 'तू नेहमी आई आणि बहिणीसोबतच फिरते, नवरा कुठेच नसतो'; चाहत्यांचा अमृताला प्रश्न, अभिनेत्रीनेही दिलं योग्य उत्तर Amruta Khanvilkar reaction on fan comment asking about her husband Himanshu Malhotra Entertainment latest update detail marathi news Amruta Khanvilkar : 'तू नेहमी आई आणि बहिणीसोबतच फिरते, नवरा कुठेच नसतो'; चाहत्यांचा अमृताला प्रश्न, अभिनेत्रीनेही दिलं योग्य उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/18/6cb5c6a7da4c7659aabeb21ea08f84a01716054026757720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar ) हीने बॉलीवूडसह मराठी सिनेसृष्टीही गाजवली आहे. तिच्या अभिनयाचे आणि तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. तसेच तिच्या अभिनयाने ती कायमच प्रेक्षकांची मनंही जिंकत आलीये. अमृता ही तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडियावर बरीच व्यक्त होते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता. त्यातच सध्या अमृता ही लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. तिथलेही तिचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.पण सध्या अमृता एका फोटोवरील कमेंटमुळे बरीच चर्चेत आली आहे.
अमृताने अभिनेता हिमांशु मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली आहे. हे सेलिब्रेटी जोडपंही अनेकांच्या पसंतीस पडतं. पण अमृता ही अनेकदा फिरतानाचे फोटो तिच्या आईसोबत आणि बहिणीसोबत टाकते. त्यामुळे हिमांशु कुठेय असा प्रश्न अनेकांना पडतो. अमृता सध्या लंडनमध्ये असून ती इथलेही फोटो तिच्या आईसोबतच शेअर करत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत हिमांशु कुठे असा प्रश्न विचारला. त्यावर अमृतानेही योग्य उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
अमृताच्या फोटोवर नेटकऱ्यांची कमेंट
अमृताने तिचा लंडनमधील एक फोटो तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यावर एका व्यक्तीने कमेंट करत विचारलं की, तू कधीच हिमांशूसोबत का फिरत नाही? आम्ही तुम्हाला दोघांना क्वचितच एखाद्या ट्रीपला गेलेलं बघितलं असेल. कारण तुझ्यासोबत नेहमी आई किंवा बहीण असते. या कमेंटवर अमृतानेही उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यावर अमृताने म्हटलं की, 'हिमांशु इन्स्टाग्रामवर नाही. म्हणजे त्याचं अकाऊंट आहे पण तो फारसा पोस्ट करत नाही, कोणाला फॉलो करत नाही. त्यामुळे फोटो पोस्ट करण्यात काही पॉइंट नाही आणि आम्हाला काही गोष्टी खासगी ठेवायलाच आवडतात.'
View this post on Instagram
चाहत्यांनी केली अमृताकडे ही मागणी
दरम्यान तिच्या या उत्तराने चाहत्यांचं समाधान झाल्याचंही पाहायला मिळत आहे. तसेच पुढे चाहत्यांनी अमृताकडे एक विनंती देखील केली आहे. यावर त्या चाहत्याने अमृताला म्हटलं की, 'कृपया एकत्र फोटो पोस्ट करा, नच बलियेपासून मला तुमची जोडी आवडते. तुम्ही शोचे विजेतेही होतात. सोबत फोटो पोस्ट करा मला तुमच्या जोडीची खूप आठवण येते.' त्यावर अमृताने नक्कीच असं म्हणत चाहत्यांची ही मागणी मान्य केल्याचंही पाहायला मिळतंय.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)