एक्स्प्लोर
कॉमेडी किंग कपिल शर्माविरोधात पोलिसात तक्रार
मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये नर्सला चुकीच्या पद्धतीने दाखवल्यामुळे, तसेच त्यांच्यावर वाईट जोक केल्यामुळे दिल्लीच्या एका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऑल इंडिया नर्सेस फाऊंडेशनने ही तक्रार नोंदवली आहे.
‘द कपिल शर्मा शो’मध्ये नर्सला आक्षेपार्ह ड्रेसमध्ये दाखवण्यात आलं. तसंच बोचरे विनोद करण्यात आल्याने नर्स फाऊंडेशन नाराज आहे. अमृतसरच्या सरकारी रुग्णालय आणि गुरुनानक देव रुग्णालयातील नर्सनी कपिलविरोधात मोर्चा उघडला आहे.
"कपिलने त्याच्या शोद्वारे नर्सेसची प्रतिमा खराब केली आहे. त्याला नवज्योतसिंह सिद्धूनेही साथ दिली. सिद्धूने त्याला रोखायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे कपिलने देशाची माफी मागावी", असं नर्सचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement