(Source: Poll of Polls)
Piyush Mishra: सातवीत महिला नातेवाईकानं केलेलं लैंगिक शोषण; पियुष मिश्रा म्हणाले, "माझ्या आयुष्यावर परिणाम झाला..."
पियुष मिश्रा (Piyush Mishra) यांनी पुस्तकात लिहिलं की, इयत्ता सातवीमध्ये असताना एका महिला नातेवाईकाने त्यांचे लैंगिक शोषण केले.
Piyush Mishra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते पियुष मिश्रा (Piyush Mishra) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्यांनी गायलेल्या गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. पियुष मिश्रा यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट्सला लोक गर्दी करतात. सध्या पियुष मिश्रा हे त्यांच्या 'तुम्हारी औकात क्या है पियुष मिश्रा' (Tumhari Auqaat Kya Hai Piyush Mishra) या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. या पुस्तकामध्ये पियुष यांनी त्यांना आयुष्यात आलेल्या अनुभवाबद्दल लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये पियुष यांनी एका अत्यंत धक्कादायक घटनेचा उल्लेख केला आहे. पियुष यांनी पुस्तकात लिहिलं की, ते इयत्ता सातवीमध्ये असताना एका महिला नातेवाईकाने त्यांचे लैंगिक शोषण केले.
काय म्हणाले पियुष मिश्रा?
'तुम्हारी औकात क्या है पियुष मिश्रा' या पुस्तकामध्ये लैंगिक शोषणाबद्दल केलेल्या उल्लेखाबाबत एका मुलाखतीत पियुष मिश्रा यांनी सांगितलं. ते म्हणाले, 'सेक्स ही हेल्दी गोष्ट आहे. याबद्दल तुमची पहिली आठवण ही चांगली असावी, नाहीतर ती तुम्हाला आयुष्यभर त्रास देते. त्या लैंगिक अत्याचाराने माझ्या आयुष्यावर परिणाम झाला. त्यातून बाहेर यायला मला बराच वेळ लागला. मला कोणाचाही सूड घ्यायचा नव्हता, कोणाला दुखवायचे नव्हते.'
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन पियुष मिश्रा यांनी त्यांच्या 'तुम्हारी औकात क्या है पियुष मिश्रा' या पुस्तकाची माहिती दिली. त्यांनी पुस्तकाचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करुन त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हे पुस्तक तुमच्यासाठी, हे माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहे. जे माझ्या मनात बालपणापासून होते, ते मी यामध्ये मांडले आहे. अनेक किस्से आणि गोष्टी यामध्ये आहेत. '
View this post on Instagram
पियुष मिश्रा यांचे चित्रपट
पियुष मिश्रा यांनी 'तुम्हारी औकात क्या है पियुष मिश्रा' या पुस्तकामध्ये अनेक किस्से लिहिले आहेत. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या विशाल भारद्वाज यांच्या 'मकबूल’ या चित्रपटात पियुष यांनी काम केलं. तसेच गुलाल, गैंग्स ऑफ वासेपूर यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. तसेच ते गीतकार, गायक, पटकथा लेखक देखील आहेत. पिंक, संजू, हॅप्पी भाग जायेगी या चित्रपटांमध्ये पियुष यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. भारत एक खोज या मालिकेमध्ये देखील पियुष यांनी काम केले आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: