एक्स्प्लोर
सचिनची मुलगी सारा आणि रणवीर सिंहचा फोटो व्हायरल!
मुंबई : सोशल मीडियावर सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि अभिनेता रणवीर सिंहचा एक फोटो व्हारल होत आहे. त्यामुळे सारा बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
याआधीही अनेक वेळा सारा तेंडुलकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. त्यातच व्हायरल होणाऱ्या फोटोवरुन सारा सिनेमात करिअर करणार असल्याचा कयास बांधत असाल तर ते चुकीचं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो एका पार्टीतील आहे. या पार्टीत सचिन, त्याची पत्नी अंजली आणि मुलगी साराही उपस्थित होती. या पार्टीला अभिनेता रणवीर सिंहनेही हजेरी लावली होती. त्यावेळी सारा आणि रणवीर सिंहला अशा अंदाजात कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं.
स्वत: सचिन तेंडुलकरने सारा सिनेमात करणार असल्याच्या चर्चा फेटाळल्या होत्या. सचिनने दोन वर्षांपूर्वी ट्वीट केलं होतं की "माझी मुलगी सारा तिचा अभ्यास एन्जॉय करत आहे. ती सिनेमात येणार असलेली वृत्त आधारहीन आहेत.
https://twitter.com/sachin_rt/status/592586021100879872
यानंतरही पार्टीत काढलेल्या सारा आणि रणवीरच्या फोटोवरुन सोशल मीडिया जोरदार चर्चा रंगली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement