Pathan: किंग खानचा जबरा फॅन... मित्राच्या पाठीवर बसून दिव्यांग व्यक्ती गेला 'पठाण' पहायला; पाहा व्हिडीओ
Bollywood Movie Pathan: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पठाण (Pathaan) चित्रपट पाहण्यासाठी एक दिव्यांग व्यक्ती त्याच्या मित्राच्या पाठीवर बसून चित्रपट पाहण्यासाठी गेल्याचं दिसत आहेत.
Pathan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. शाहरुखच्या काही चाहत्यांना पठाण पाहण्यासाठी अख्खं थिएटरबुक केलं. पठाण चित्रपट पाहण्यासाठी थिएटर बाहेर अनेक जण गर्दी करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पठाण चित्रपट पाहण्यासाठी एक दिव्यांग व्यक्ती त्याच्या मित्राच्या पाठीवर बसून पठाण चित्रपट पाहण्यासाठी गेल्याचं दिसत आहेत.
हलीम हक नावाच्या एका युझरनं 35 सेकंदाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, 'शाहरुखचा एक अपंग चाहता स्वतःच्या पायावर चालू शकत नाही. तो बिहारमधील भागलपूर येथून आपल्या मित्राच्या पाठीवर स्वार होऊन पश्चिम बंगालमधील मालदा येथील समसी पवन टॉकीज सिनेमागृहात पठाण चित्रपट पाहण्यासाठी गेला.' हलीम हकनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 98 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास 500 पेक्षा अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स देखील केल्या आहेत. या व्हिडीओमधील या दोन मित्रांच्या मैत्रीनं नेटकऱ्यांची मनं जिंकली.
पाहा व्हिडीओ:
A disabled fan of @iamsrk, who cannot walk on his own feet. He rode on his friend's shoulder from Bhagalpur in Bihar to watch the movie Pathan at Samsi Pawan Talkies cinema hall in Malda, West Bengal.❤️#FDFS#pathan#mausambigadchukahai
— Halim Hoque (@halim_hoque) January 25, 2023
🔥 pic.twitter.com/lYsl4kt8dM
25 जानेवारीला रिलीज झाला चित्रपट
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पठाणनं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 100 कोटींची कमाई केली आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन (Spain), यूएई (UAE), तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका पादुकोण सोबतच जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. शाहरुखचे जवान आणि डंकी हे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या:
Pathaan Housefull: पठाणची काश्मिरमध्ये जादू; तब्बल 32 वर्षांनी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड