Pathan : राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात शाहरुख खानच्या 'पठाण'चे स्पेशल स्क्रिनिंग; फोटो समोर
Pathan In Rashtrapati Bhavan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' (Pathaan) या सिनेमाचे राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात स्पेशल स्क्रिनिंग आयोजन करण्यात आले आहे.
SRK Pathan In Rashtrapati Bhavan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण'ची (Pathan) जगभरात क्रेझ आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहे. भारतासह परदेशातील सिनेप्रेक्षकांकडून या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. आता राष्ट्रपती भवनाच्या (Rashtrapati Bhavan) सांस्कृतिक केंद्रात (Cultural Centre) या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे.
गेल्या चार वर्षांपासून शाहरुखचे चाहते त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता 'पठाण'च्या (Pathaan) माध्यमातून त्याने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं असून त्याचा अॅक्शन मोड चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहत्यांमध्ये त्याच्या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. आता राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले आहे.
एसएस खान यांनी ट्वीट केलं आहे,"राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाचे (Shah Rukh Khan Pathan In Rashtrapati Bhavan) स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रत खूप कमी सिनेमे प्रदर्शित झाले आहेत".
At special screening of #Pathan at Rashtrapati Bhavan cultural centre. @iamsrk @pooja_dadlani pic.twitter.com/976WYSDovw
— SM Khan (@SmkhanDg) January 28, 2023
जगभरात शाहरुखच्या 'पठाण'चा जलवा!
शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने जगभरात 400 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे भारतीय बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या चार दिवसांत हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पाच दिवसांत हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
'पठाण' या सिनेमात शाहरुख खानसह दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहमदेखील (John Abrham) आहे. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमानची झलकदेखील या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून आज सिनेमा बजेटपेक्षा अधिक कमाई करेल असे म्हटले जात आहे. जगभरात हा सिनेमा 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. 'झुमे जो पठाण' आणि 'बेशरम रंग' सिनेमातील ही गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
संबंधित बातम्या