एक्स्प्लोर

Pathaan box office Day 18: भारतातीलच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर पठाणचा डंका; 18 व्या दिवशी केली एवढी कमाई

पठाण (Pathaan) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत. आता 18 व्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Pathaan box office Day 18: अभिनेता शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट खास आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखचा कमबॅक हा ब्लॉकबस्टर ठरला आहे. पठाण चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत. आता 18 व्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात पठाण चित्रपटाचं 18 व्या दिवसाचं कलेक्शन...

शनिवारी (11 फेब्रुवारी) पठाण या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 924 कोटींचा टप्पा पार केला आहे. शनिवारी (11 फेब्रुवारी) या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर 11 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या भारतातील आतापर्यंतच्या  कमाईनं 459.25 कोटींचा टप्पा गाठला आहे, अशी माहिती तरण आदर्श यांनी ट्वीटमधून दिली आहे.  आता भारतामध्ये 500 कोटी आणि जगभरामध्ये 1000 कोटींच्या क्लबमध्ये पठाण सामील होईल का? या प्रश्नाचं उत्तर शाहरुखच्या चाहत्यांना लवकरच मिळाले. 

पठाण चित्रपट हा आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू  या भाषांमध्ये पठाण हा चित्रपट रिलीज झाला. 

पठाणमधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती

पठाण चित्रपटामधील गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामधील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या दोन गाण्यांवरील रिल्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. बेशरम रंग या गाण्यातील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Pathan Fans in Germany: कडाक्याच्या थंडीत जर्मनीमधील चाहते थिरकले 'झुमे जो पठाण'वर; व्हायरल व्हिडीओला शाहरुखची भन्नाट कमेंट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीलाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 07 January 2025Dhananjay Deshmukh : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणारJob Majha : युको बँकेत नोकरीची संधी, अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Embed widget