Parineeti Chopra Raghav Chadha : राघव आणि परिणीती यांचा साखरपुड्यातील रोमँटिक व्हिडीओ व्हायरल; केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष
राघव (Raghav Chadha) आणि परिणीती (Parineeti Chopra) यांचा साखरपुडा पार पडला आहे. त्यांच्या साखरपुड्यामधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Parineeti Chopra Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांचा काल साखरपुडा पार पडला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत राघव आणि परिणीती यांचा साखरपुडा दिल्ली येथील कपूरथला हाऊसमध्ये पार पडला. राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हजेरी लावली होती. राघव आणि परिणी यांच्या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सध्या राघव आणि परिणी यांच्या साखरपुड्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील राघव आणि परिणीती यांच्यामधील केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
राघव आणि परिणीती यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये परिणीती राघवसोबत 'माही मैनू छड योना कि तेरे बिना दिल नहीं' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये राघव आणि परिणीती यांच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हिडीओ:
The best part about these videos coming out of Raghav and Parineeti's Engagement ceremony is that it brings a welcome change, Politicians are just normal human beings and do not need to act holier than thou all the time.
— Roshan Rai (@RoshanKrRaii) May 13, 2023
Very heart-warming. pic.twitter.com/el1pjMknG9
परिणीती आणि राघव यांच्या शाही साखरपुड्याची थीम हटके होती. त्या दोघांनी पेस्टल रंगाचे आकर्षक कपडे घातले होते. दोघेही या अतिशय सुंदर दिसत होते. परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर साखरपुड्यातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कमेंट करुन रणवीर सिंह, अनुष्का शर्मा, नेहा कक्कर, भूमी पेडणेकर, कनिका कपूर, नेहा धुपिया यांनीदेखील जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, दावत-ए-इश्क यांसारख्या हिट चित्रपटांमधून परिणीतीनं काम केलं. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीतीचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Parineeti Raghav Engagement : खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक; परिणीती आणि राघवचा रॉयल साखरपुडा