Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती-राघवची लगीनघाई! फक्त 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत नवी-दिल्लीत होणार साखरपुडा
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीचा चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा येत्या शनिवारी नवी दिल्लीत साखरपुडा होणार आहे.
![Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती-राघवची लगीनघाई! फक्त 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत नवी-दिल्लीत होणार साखरपुडा Parineeti Chopra Raghav Chadha Engagement Details Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update new delhi Engagement Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती-राघवची लगीनघाई! फक्त 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत नवी-दिल्लीत होणार साखरपुडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/47a1288c06ae02dc7278cd8388b7a9d41683691913168254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Parineeti Chopra Raghav Chadha Engagement Details : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पण त्या दोघांनीही अजून त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. पण आता त्यांच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा येत्या शनिवारी नवी दिल्लीत साखरपुडा होणार असल्याचं बोललं जात आहे. त्या दोघांच्या साखरपुड्याला फक्त 150 मंडळी हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण परिणीती चोप्रा किंवा राघव चड्ढा यांच्याकडून साखरपुड्याच्या बातमीला दुजोरा मिळालेला नाही.
View this post on Instagram
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राचा साखरपुडा (Parineeti Chopra Raghav Chadha Engagement) 13 मे 2023 रोजी नवी दिल्लीत होणार आहे. फक्त 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडणार आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत हा साखरपुडा होणार आहे.
परिणीती चोप्रा अन् राघव चड्ढा लग्न कधी करणार? (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update)
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नसोहळ्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात ते लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची अधिकृत तारीख समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी दोघेही मुंबईत स्पॉट झाले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये परिणीती लाजताना दिसत होती.
परिणीती आणि राघव अनेकदा मुंबई किंवा दिल्ली विमानतळावर एकत्र स्पॉट होतात. त्यांनी त्यांचं नातं गुलदस्त्यात ठेवलं असलं तरी पंजाबी गायक हार्डी संधूने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. तसेच आपचे संजीव आरोडा यांनी ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. परिणीती आणि राघव यांची पहिली भेट एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. पुढे त्यांची मैत्री वाढली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रासोबतच्या लग्नाच्या चर्चांबद्दल खासदार म्हणाले,"लवकरच सेलिब्रेशन..."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)