Saas Bahu Achaar Pvt. Ltd : पंचायतच्या निर्मात्यांनी केली आगामी वेब सीरिजची घोषणा; अमृता सुभाष मुख्य भूमिकेत
Saas Bahu Achaar Pvt. Ltd : 'सास बहू आचार प्रायवेट लिमिटेड' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Saas Bahu Achaar Pvt. Ltd : महिलादिनी 'सास बहू आचार प्रायवेट लिमिटेड' (Saas Bahu Achaar Pvt. Ltd) या वेबसीरिजची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून ही वेबसीरिज चर्चेत आहे. आता या बहुचर्चित वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 8 जुलैपासून प्रेक्षकांना ही सीरिज पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) मुख्य भूमिकेत आहे.
अमृता सुभाष मुख्य भूमिकेत
'सास बहू आचार प्रायवेट लिमिटेड' या वेबसीरिजमध्ये अमृता सुभाष मुख्य भूमिकेत आहे. अमृतासह यामिनी दास, अनूप सोनी, अंजना सुखानी आणि आनंदेश्वर द्विवेदी या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. हिंदी भाषेत ही सीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर अरुणाभ कुमार आणि अपूर्व सिंह कार्कीने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. तर अपूर्व सिंह कार्कीनेच या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
View this post on Instagram
'सास बहू आचार प्रायवेट लिमिटेड' ही वेबसीरिज दिल्लीतल्या चांदणी चौकातील सुमनच्या आयुष्यावर आधारित आहे. घर चालवण्यासाठी सुमन लोणचे विकण्याचा व्यवसाय करू लागते. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना सासू-सुनेची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. पंचायत वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता तेच निर्माते नवी वेब सीरिज करत असल्याने चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या वेबसीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
Bhool Bhulaiyaa 2 : रिलीजच्या एक महिन्यानंतरदेखील बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा दबदबा; जगभरात केली 230 कोटींची कमाई
Dharmaveer : आनंद दिघेंच्या नावाने आणि 'धर्मवीर' सिनेमाच्या पडद्याआडून गद्दारांनी सहानभूती मिळवली; संजय सावंत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
Atal Bihari Vajpayee : अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर येतोय सिनेमा; 99 व्या जयंतीला होणार रिलीज
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















