Cannes Panchayat Fame Ashok Pathak : फक्त टाळ्या, टाळ्या अन् टाळ्याच; पंचायत फेम 'बिनोद'च्या चित्रपटानं कान्स फेस्टिवल गाजवलं, मराठी अभिनेत्रीचीही आहे खास भूमिका
Cannes Panchayat Fame Ashok Pathak : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'मध्ये बिनोदची भूमिका साकारणाऱ्या अशोक पाठकवर कान्स महोत्सवात कौतुकाचा वर्षाव झाला.
![Cannes Panchayat Fame Ashok Pathak : फक्त टाळ्या, टाळ्या अन् टाळ्याच; पंचायत फेम 'बिनोद'च्या चित्रपटानं कान्स फेस्टिवल गाजवलं, मराठी अभिनेत्रीचीही आहे खास भूमिका Panchayat Binod At Cannes Film Festival 2024 Fans React Standing ovation for his sister midnight movie radhika apte also in lead Cannes Panchayat Fame Ashok Pathak : फक्त टाळ्या, टाळ्या अन् टाळ्याच; पंचायत फेम 'बिनोद'च्या चित्रपटानं कान्स फेस्टिवल गाजवलं, मराठी अभिनेत्रीचीही आहे खास भूमिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/e9af3fc2944ddc02a227e07a49c5a4c11716264819144290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Cannes Panchayat Fame Ashok Pathak : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'मध्ये (Panchayat Web Series) बिनोदची भूमिका साकारणाऱ्या अशोक पाठकवर (Ashok Pathak) कान्स महोत्सवात (Cannes) कौतुकाचा वर्षाव झाला. कान्स चित्रपट महोत्सवात डायरेक्टर्स फोर्टनाईटनुसार अशोकची प्रमुख भूमिका असलेला 'सिस्टर मिडनाईट' (Sister Midnight) चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहत जवळपास 10 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला. या चित्रपटात राधिका आपटे ही देखील प्रमुख भूमिकेत आहे.
कान्समध्ये आला बिनोद...
पंचायत वेब सीरिजमध्ये अशोकने विनोदची छोटीशी भूमिका साकारली होती. 'देख रहा है ना बिनोद...' या डायलॉगवर मीम्सची लाट आली होती. अशोक पाठकने कान्स फेस्टिवलमधील काही फोटो शेअर्स केले आहेत. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये 'सिस्टर मिडनाईट'या चित्रपटाच्या कौतुकाचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. करण कंधारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. एका विवाहित स्त्री झोपडीवस्तीत राहत असताना तिच्या वैवाहिक आयुष्यात कोणत्या अडचणी येतात, सहन करण्यापलिकडे अन्याय झाल्यावर ती काय करते, याभोवती हा चित्रपट आहे. अशोक पाठक याने राधिकाच्या दारुड्या पतीची भूमिका साकारली.
View this post on Instagram
View this post on Instagram
'पंचायत'ने बदलले आयुष्य
गेल्या वर्षी 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अशोकने म्हटले की, 'पंचायत'मध्ये साकारलेल्या विनोदच्या व्यक्तिरेखेने आयुष्याला कलाटणी मिळाली. 'मी 2011 पासून इंडस्ट्रीत आहे आणि बिट्टू बॉस (2012), 102 नॉट आऊट (2018) आणि सेक्रेड गेम्ससह अनेक चांगल्या प्रोजेक्ट्सचा भाग आहे, पण विनोदने माझे आयुष्य बदलून टाकले असल्याची भावना त्याने व्यक्त केली. सगळेच जण ओळखू लागले असून लोकांचे खूप प्रेम मिळत असल्याचेही अशोकने पाठकने सांगितले.
'पंचायत-3' होणार प्रदर्शित
पंचायत-3 चा प्रीमियर 28 मे रोजी प्राईम व्हिडीओवर होणार आहे. ही वेब सीरिज हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
इतर संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)