एक्स्प्लोर

रिव्ह्यू: भव्य, रेखीव, नेत्रदीपक - पद्मावत

या संपूर्ण चित्रपटावर भन्साळी छाप आहे. पण यातलं मोठं सरप्राइज पॅकेज आहे ते रणवीर सिंगचं.

शुक्रवार आला की आपण वाट पाहातो ती नव्या सिनेमाची. पण यावेळी मात्र एक दिवस आधीच म्हणजे गुरुवारी चित्रपट प्रदर्शित होतोय. या सिनेमाचं नाव आहे बहुचर्चित असा पद्मावत. संजय लीला भन्साळी यांच्या या नव्या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटाचं शूट सुरू झाल्यापासून हा सिनेमा सतत चर्चेत आहे. कधी सेट जाळले गेले तर कधी दिग्दर्शकाला मारहाण झाली. कलाकारांच्या नावाचे फतवे काढले गेले. आणि या अडचणी कमी म्हणून की काय, सेन्सॉर बोर्डाने आपला नियम दाखवत या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं. आणि आता अखेर २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. संजय लीला भन्साळी यांनी यापूर्वी केलेले चित्रपट पाहता सिनेमा या माध्यमाकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारा दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपला हा वकुब त्यांनी या चित्रपटातही पाळला आहे. या सिनेमाचं शूट सुरू झाल्यापासून चर्चा होती ती या सिनेमात दिग्दर्शकाने घेतलेल्या सिनेमॅटिक लिबर्टीची. या सिनेमातही त्यांनी तशी लिबर्टी घेतली आहे. मग ते राणी पद्मावतीचं घुमर गाण्यातला नाच असो किंवा अल्लाउद्दीन खिल्जीचं खलबलीमधला नाच असो. एक नक्की की अशी लिबर्टी घेताना ऐतिहासिक व्यक्तिरेखांची मानहानी होऊ नये याची काळजी घेतली जायला हवी. ती इथे घेतलेली दिसते. राजपूत घराणं, राजा रतनसिंह, पद्मावती यांचा मान, आब राखत हा चित्रपट बनवला गेला आहे. मलिक महम्मद जायसी यांच्या पद्मावत या काव्यावर हा सिनेमा बेतला आहे. ही गोष्ट राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिल्जी या कपटी सुलतान यांची आहे. राणा रतनसिंह यांची पत्नी पद्मावतीच्या सौंदर्याची महती खिल्जीच्या कानावर पडते. तिला पाहण्यासाठी तो चितोडकडे कूच करतो. तिला मिळवण्यासाठी चितौडला वेढा घालतो. पण शेवटी पद्मावती त्याच्या हाती लागण्यापेक्षा जौहर पत्करते हे तर आपण जाणतो. मग ही गोष्ट दिग्दर्शकाने दाखवली कशी हा यातला मुख्य मुद्दा आहे. या संपूर्ण चित्रपटावर भन्साळी छाप आहे. अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा रणवीर सिंग, पद्मावती साकारणारी दीपिका पदुकोण आणि रतनसिंह यांची भूमिका करणारा शाहीद कपूर या तिघांनीही आपल्या भूमिकेला साजेसा अभिनय केला आहे. पण यातलं मोठं सरप्राइज पॅकेज आहे ते रणवीर सिंगचं. त्याने राक्षसी महत्वाकांक्षा असलेला अल्लाउद्दीन खिल्जी अफलातून रंगवला आहे. त्याच्या ताकदीला टक्कर दिली ती दीपिकाच्या सौंदर्याने आणि संवादांनी. तुलनेने शाहीद कपूरची यातली भूमिका किंचित दुय्यम आहे. पण त्याने धोरणी, तत्वनिष्ठ राजा नेटका रंगवला आहे. सिनेमा बघताना रणवीर सिंगचा अल्लाउद्दीन पाहता रतनसिंहसुद्धा थोडे धिप्पाड असते तर ती जुगलबंदी प्रेक्षणीय झाली असती असं वाटून जातं. या कलाकारांसोबत आदिती राव हैदरी, रझा मुराद यांनीही अपेक्षित अभिनय केला आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टीमधून अल्लाउद्दीनचा वेडसरपणा दिग्दर्शकाने दाखवला आहे. मग होळी दिवशी चेहऱ्याला रंग फासणं असो किंवा आपलंच रक्त आपल्या तोंडाला माखणं असो. पद्मावतीची चाणाक्ष बुद्धी दाखवतानाही प्रसंगांचं भान राखत तिच्या तोंडी असलेले संवाद तिच्या हुशारीची साक्ष पटवतात. यातील संगीतही चांगलं आहे. घुमर, एक दिल एक जान ही गाणी चांगली जमून आली आहेत. पण त्याचवेळी खलबली हे गाणं मात्र कानाला खटकतं. त्याची कोरिओग्राफी ही आजच्या काळातली वाटते. नेटकी पटकथा, चांगले संवाद आणि अप्रतिम भव्यता यामुळे हा चित्रपट निश्चित प्रेक्षणीय होतो, खिळवून ठेवतो. म्हणूनच या चित्रपटाला पिक्चर बिक्चरमध्ये मिळतोय रेड हार्ट.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'इथलं वातावरण भयानक..' इम्रान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री दुबईमध्ये अडकली; पोस्ट व्हायरल
'इथलं वातावरण भयानक..' इम्रान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री दुबईमध्ये अडकली; पोस्ट व्हायरल
सचिन पिळगावकरांना ट्रोल करणारे नेमके कोण? 'नवरा माझा नवसाचा' फेम अभिनेता स्पष्टच बोलला
सचिन पिळगावकरांना ट्रोल करणारे नेमके कोण? 'नवरा माझा नवसाचा' फेम अभिनेता स्पष्टच बोलला
'यह अल्लाह का कहर..' इराणवर भयानक हल्ला; प्रसिद्ध अभिनेत्यानं VIDEO तून दिला सल्ला, म्हणाला...
'यह अल्लाह का कहर..' इराणवर भयानक हल्ला; प्रसिद्ध अभिनेत्यानं VIDEO तून दिला सल्ला, म्हणाला...
विजय थलापतीच्या आयुष्यात वादळ, पत्नीकडून घटस्फोटासाठी अर्ज, अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप; मुलानं उचललं मोठं पाऊल..
विजय थलापतीच्या आयुष्यात वादळ, पत्नीकडून घटस्फोटासाठी अर्ज, अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप; मुलानं उचललं मोठं पाऊल..

व्हिडीओ

Tejas Express Delay : तेजस एक्सप्रेस ७ तास उशिराने, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
Gadchiroli Old Lady Death Special Report बँकेच्या ढिसाळ कारभारानं महिलेचा जीव गेला,कुटुंबीयांचा आरोप
Israel US attack Iran Special Report : अमेरिका-इराण संघर्षाचा जगावर काय परिणाम?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : एका फटक्यात इराणचे 48 नेते ठार केले, मी योग्य तेच करतोय; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणच्या नव्या नेतृत्वासोबत चर्चेची तयारी
एका फटक्यात इराणचे 48 नेते ठार केले, मी योग्य तेच करतोय; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणच्या नव्या नेतृत्वासोबत चर्चेची तयारी
Israel Iran Conflict : अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद ठार? पश्चिम आशियात तणाव शिगेला
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद ठार? पश्चिम आशियात तणाव शिगेला
Dr. Shyamala Vanarase : प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. श्यामला वनारसे यांचं निधन; साहित्य, बालकारण आणि मानसशास्त्र क्षेत्राची मोठी हानी
प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. श्यामला वनारसे यांचं निधन; साहित्य, बालकारण आणि मानसशास्त्र क्षेत्राची मोठी हानी
India Iran Trade : इराणकडून भारत काय आयात करतो? युद्ध भडकल्यास कोणत्या वस्तू महागणार?
इराणकडून भारत काय आयात करतो? युद्ध भडकल्यास कोणत्या वस्तू महागणार?
इस्त्रायल अमेरिकेनं सर्वोच्च धर्मगुरु खोमेनींना टार्गेट केलं असताना इराणने पहिल्यांदा 'सेफ हेवन' दुबई, अबुधाबी, कतारला भाजून का काढलं? बुर्ज खलिफा रिकामा करावा लागला, विमानतळ सुद्धा बंद!
इस्त्रायल अमेरिकेनं सर्वोच्च धर्मगुरु खोमेनींना टार्गेट केलं असताना इराणने पहिल्यांदा 'सेफ हेवन' दुबई, अबुधाबी, कतारला भाजून का काढलं? बुर्ज खलिफा रिकामा करावा लागला, विमानतळ सुद्धा बंद!
Israel Vs Iran War: अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
Gold Silver Price Today: इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
Embed widget