OTT Release Laapataa Ladies : थिएटरनंतर ओटीटीवर आज रिलीज होणार लापता लेडीज; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
OTT Release Laapataa Ladies : समिक्षकांसह प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते. चित्रपटगृहानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आजपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
OTT Release Laapataa Ladies : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. चित्रपट समिक्षकांसह प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते. चित्रपटगृहानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आजपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 'लापता लेडीज' चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शिका किरण रावने (Kiran Rao) रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले.
'लापता लेडीज' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी बंपर कमाई केली नसली तरी चित्रपटाचा आशय, कलाकारांचा अभिनय, संवाद अशा विविध गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. सामाजिक विषय हाताळला गेल्यानेही चित्रपटाचे कौतुक करण्यात आले. आता ओटीटीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज
गुरुवारी, 'लापता लेडीज'चित्रपट आता ओटीटीवर शुक्रवारपासून रिलीज होणार असल्याचे 'नेटफ्लिक्स'ने जाहीर केले. 26 एप्रिलपासून हा चित्रपट ऑनलाइन रिलीज होणार असल्याचे नेटफ्लिक्सने सांगितले. त्यामुळे ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही आणि ज्यांना पुन्हा पाहायचा आहे, अशा दोन्ही प्रेक्षकांना लापता लेडिज पाहता येणार आहे.
View this post on Instagram
कलाकारांचा दमदार अभिनय...
या चित्रपटात कोणताही मोठं वलय असलेला सेलिब्रिटी नाही. रवी किशनशिवाय स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोईल, प्रतिभा रत्ना, छाया कदम आदींच्या भूमिका आहेत. छाया कदम यांनीदेखील या चित्रपटात आपली छाप सोडली आहे. किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट 1 मार्च रोजी रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 50 दिवस हा चित्रपट मोठ्या पडद्यावर सुरू होता.
काय आहे सिनेमाची गोष्ट?
लापता लेडीज ही दोन महिलांची गोष्ट आहे. नवीनच लग्न झालेला दीपक आपल्या बायकोला घेऊन त्याच्या गावी जातो. पण घरात नवरीचा पदर उचलला की सगळ्यांचेच डोळे उघडे राहतात. फूल कुमारीशी लग्न करायला गेलेला दीपक, पुष्पाला घरी घेऊन येतो. फुल कुमारी कुठे आहे आणि पुष्पा कोण आहे याचे रहस्य चित्रपटाच्या अखेरीस उलगडते. हा चित्रपट सामाजिक संदेशही देतो.