एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Oscar Nominations 2023 : राजामौलींचा 'RRR' ते 'छेल्लो शो'; भारताच्या 'या' सिनेमांचा ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत समावेश!

Oscar 2023 : 'ऑस्कर 2023'मध्ये भारतातील अनेक दर्जेदार सिनेमांचा समावेश होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Oscar Nominations 2023 List : ऑस्कर (Oscar) हा जगभरातील सिनेप्रेमींसाठी मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. सिनेजगतातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅंड सायन्स आज ऑस्करसाठी नामांकन मिळणाऱ्या सिनेमांची यादी जाहीर करणार आहे. 'ऑस्कर नामांकन 2023' (Oscar Nominations 2023) भारतासाठी खूपच खास असणार आहे. यात राजामौलींच्या (Rajamouli) आरआरआर (RRR) पासून ते बहुचर्चित 'छेल्लो शो' (Chhello Show) पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे. 

ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत भारताच्या चार कलाकृती!

ऑस्कर नामांकनांच्या शर्यतीत भारताच्या चार कलाकृतींचा समावेश आहे. भारताकडून 'आरआरआर' (RRR) आणि 'छेल्लो शो' (Chhello Show) या सिनेमांना 'ऑस्कर 2023' (Oscar 2023) साठी अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आले आहे. तसेच 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) आणि 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटांचा देखील समावेश आहे. 

ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत भारतीतील कलाकृतींबद्दल जाणून घ्या...

आरआरआर (RRR)  

'आरआरआर' या सिनेमाची कथा बंडखोर कोराराम भीम आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. या सिनेमात एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते. तसेच अजय देवगन आणि श्रिया सरनची झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळाला आहे. तसेच या सिनेमातील 'नाटू नाटू'  हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 

छेल्लो शो (Chhello Show) 

'छेल्लो शो' या सिनेमात एका नऊ वर्षीय मुलाचा ध्येयवेडा प्रवास दाखवण्यात आला आहे. खेडेगावात राहणारा मुलगा सिनेमा पाहतो आणि तो सिनेमा त्याला कसं घडवतो हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. कष्ट करण्याची, मेहनत घेण्याची तयारी असेल तर स्वप्न साकार करता येतं यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे,. या गुजराती भाषित सिनेमाने अनेक पुरस्कार सोहळ्यांत बाजी मारली आहे. पान नलिन दिग्दर्शित या सिनेमात भावेश श्रीमाली, भाविन राबरी, ऋचा मीणा, परेश मेहता आणि दीपेन रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 

ऑल दॅट ब्रीथ्स (All That Breathes)

'ऑल दॅट ब्रीथ्स' हा शौनक सेनचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माहितीपट आहे. मोहम्मद सऊद आणि नदीम शहनाज या दिल्लीत राहणाऱ्या दोन भावंडांवर बेतलेला हा सिनेमा आहे. जखमी पक्ष्यांना विशेषतः गरुडांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या मुलांची गोष्ट या माहितीपटात दाखवण्यात आली आहे. 

द एलिफxट व्हिस्परर्स (The Elephant Whisperers)

कार्तिकी गोन्साल्विसचा  'द एलिफंट व्हिस्पर्स' हा माहितीपट दोन हत्ती आणि त्यांची सेवा करणाऱ्या लोकांवर आधारित आहे. या माहितीपटाची निर्मिती 'पिरियड अॅन्ड ऑफ सेंटन्स' फेम ऑस्कर विजेते गुनीत मोंगा यांनी केली आहे. 

संबंधित बातम्या

Oscar Nominations 2023 List : ऑस्करची नामांकन यादी होणार जाहीर; कुठे आणि कधी पाहता येणार इव्हेंट? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget