Oscar 2021: भारताचा 'जलीकट्टू' ऑस्कर बाहेर, 'बिट्टू' अजूनही रेसमध्ये
'जलीकट्टू' (Jallikattu) ला ऑस्करच्या अंतिम 15 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवण्यात अपयश आलं आहे. पण करिश्मा दुबे दिग्दर्शित शॉर्टफिल्म 'बिट्टू' (Bittu) ने पहिल्या राउंडमध्ये धडक मारली आहे.
![Oscar 2021: भारताचा 'जलीकट्टू' ऑस्कर बाहेर, 'बिट्टू' अजूनही रेसमध्ये Oscar 2021 Nominations shortlist India Jallikattu Out of 93rd Academy Awards Oscar 2021: भारताचा 'जलीकट्टू' ऑस्कर बाहेर, 'बिट्टू' अजूनही रेसमध्ये](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/10121055/c28a1f2f-6bb8-4b39-89b3-fa74660d3be7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Oscar 2021: यंदाच्या 93 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या शर्यतीतून 'जलीकट्टू' हा भारतीय चित्रपट बाहेर पडला आहे. 'जलीकट्टू' ला अंतिम 15 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवण्यात अपयश आलं आहे. पण करिश्मा दुबे दिग्दर्शित शॉर्टफिल्म 'बिट्टू' ने पहिल्या राउंडमध्ये धडक मारली आहे. यंदाचा 93 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 25 एप्रिल रोजी पार पडणार आहे.
येत्या 15 मार्च रोजी अंतिम नामांकन जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षीच्या 93 व्या ऑस्कर सोहळ्यासाठी जगभरातून 93 चित्रपटांना नामांकन मिळाले होते. त्यामध्ये भारतातील जलीकट्टू या मल्याळम चित्रपटाचा समावेश होता. तसेच करिश्मा दुबे दिग्दर्शित शॉर्टफिल्म 'बिट्टू' चाही यात समावेश होता.
'बिट्टू' ऑस्करच्या शर्यतीत करिश्मा देव दुबे यांनी दिग्दर्शित केलेला बिट्टू शॉर्टफिल्म ऑस्करच्या शर्यतीत अजूनही आहे. बिट्टू ही शॉर्टफिल्म दोन शाळकरी मित्रांच्या जीवनावर आधारीत आहे. ही फिल्म आतापर्यंत जगातील 18 फिल्म फेस्टिवल्समध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. तर दिग्दर्शक लिजो जोस पेलीसरी यांची मल्याळम फिल्म जलीकट्टू ही भारतातून ऑस्करसाठी पाठवलेली एन्ट्री होती.
ऑस्कर विजेते अभिनेते ख्रिस्तोफर प्लमर यांचं 91 व्या वर्षी निधन
ऑस्करच्या शर्यतीत नटखट, शेमलेस, सुराराई पोट्रू हे चित्रपटही सामिल होते. यामधील सुराराई पोट्रू हा चित्रपट अकॅडेमी स्क्रीनिंग रुममध्ये अद्याप आहे. हा चित्रपट बेस्ट अॅक्टर, बेस्ट अॅक्ट्रेस, बेस्ट डायरेक्टर, रायटर आणि ओरिजनल स्कोर कॅटेटगरीमध्ये आपली दावेदारी सांगेल. या वर होणाऱ्या अंतिम मतदानानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
फॉरेन लॅंग्वेज कॅटेगरीत अजून पुरस्कार नाही फॉरेन लॅंग्वेज कॅटेगरीत अद्याप कोणत्याही भारतीय चित्रपटाने ऑस्कर पटकावला नाही. आतापर्यंत गली बॉय, व्हिलेज रॉकस्टार्स, न्यूटन, विसारानई, आणि कोर्ट हा मराठी चित्रपट फॉरेन लॅंग्वेज कॅटेगरीत ऑस्करच्या शर्यतीत होते. पण या चित्रपटांना ऑस्कर मिळवण्यात अपयश आलं होतं.
मदर इंडिया ते जल्लीकट्टू.. आतापर्यंत ऑस्करवारी केलेले चित्रपट; मराठी चित्रपटांची संख्या किती?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)