Ole Aale Trailer Out: "आयुष्य म्हणजे काय? आपण किती जगलो त्याच्यापेक्षा कसे जगलो हे महत्वाचं आहे" ; 'ओले आले'चा जबरदस्त ट्रेलर!
Ole Aale Trailer Out: ओले आले (Ole Aale) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Ole Aale Trailer Out: अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar), सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) यांचा ओले आले (Ole Aale) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बापलेकाच्या आयुष्यात काय काय घडतं? हे दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
ओले आले या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला नाना पाटेकर हे आदी म्हणजेच सिद्धार्थला बाकरवडी देताना दिसत आहेत. अशताच सिद्धार्थ नाना पाटेकर यांना म्हणतो, 'बाबा मी असलं काही खात नाही, तुम्ही खाण्यासाठी जगता मी जगण्यासाठी खातो.' अशातच ट्रेलरमध्ये मकरंद अनासपुरे यांची देखील झलक ट्रेलरमध्ये बघायला मिळते. या चित्रपटात ते बाबुराव ही भूमिका साकारणार आहेत.
डायलॉग्सनं वेधलं लक्ष
ओले आले या चित्रपटाच्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. "पैसा कमावणे आणि तो योग्य रितिने खर्च करणे या दोन्ही कला मिळणून आयुष्य बनतं" तसेच "आयुष्य म्हणजे काय? आपण किती जगलो त्याच्यापेक्षा कसे जगलो हे महत्वाचं आहे" या नाना पाटेकर यांच्या ओले आले या चित्रपटामधील डायलॉग्सला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
पाहा ट्रेलर:
View this post on Instagram
कधी रिलीज होणार चित्रपट?
'ओले आले' सिद्धार्थ चांदेकर, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विपुल मेहता यांनी केले आहे. हा चित्रपट 5 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सिद्धार्थ चांदेकरनं ओले आले या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं, "आता आनंदात करा नवीन वर्षाचा श्रीगणेशा या अप्रतिम बापलेकांसह! सादर आहे 'ओले आले'चा ताजा टवटवीत ट्रेलर! 5 जानेवारी 2024 पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.चला फिरूया, हसूया, जगूया!"सिद्धार्थनं शेअर केलेल्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: