एक्स्प्लोर

ऑक्टोबर : अव्यक्त प्रेमाचा गंध

शूजित सरकार सतत सिनेमा या माध्यमाच्या नव्या शक्यतांचा शोध घेताना दिसतात. मद्रास कॅफे, पिकू, विकी डोनर आणि आता ऑक्टोबर.. प्रत्येक सिनेमा वेगळा. विषय वेगळा.. त्याची मांडणी वेगळी. यावेळी त्यांनी या मांडणीत कवितेची गेयता शोधली आहे.

ऑक्टोबर या शूजित सरकार यांच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर आलं, त्यावेळीच लक्षात येतं की हा सिनेमा काहीतरी वेगळा  असणार आहे. कारण सर्वसाधारणपणे महिन्याचं नाव सिनेमाला दिलं जात नाही. बरं, त्यातही शुजितदांनी ऑक्टोबर हे नाव देताना त्यातल्या ओ च्या ठिकाणी पारिजात अर्थात प्राजक्ताचं फूल वापरलं. म्हणजे पोस्टरमध्ये इकडे वरूण धवन तिकडे बनिता संधू आणि मध्ये प्राजक्त. त्यातून काय सांगायचं आहे का दिग्दर्शकाला? काय सांगायचं असेल? ऑक्टोबर या सिनेमाच्या टायटलमध्ये ओच्या ठिकाणी झेंडू, जास्वंद, मोगरा, गुलाब, अबोली, सदाफुली असं काहीही वापरता आलं असतं. मग त्यांनी प्राजक्त का वापरला? शूजित सरकार यांचा ऑक्टोबर पाहून आल्यानंतर मनात रुतला होता तो प्राजक्त. कसं असतं ते फूल? प्राजक्त दिसायला टवटवीत. पांढरा आणि गडद केशरी रंगाचा. या सौंदर्याला अल्पायुषाचा शाप मिळालेला. तशातही आपलं मरण हे फुल जगाला दाखवत बसत नाही. सगळं जग निजल्यावर हळूवार गळून पडण्यात त्याचा मोक्ष ठरलेला. बरं, झाडावर असतानाही प्राजक्ताचा गंध तुम्हाला भस्सकन येत नाही. तुम्हाला तो थांबून.. डोळे मिटून.. ऊर भरून घ्यावा लागतो. त्या गंधाच्या वेगाशी तुम्हाला आधी एकरूप व्हावं लागतं. तिथे ट्यून झालात तरच हा प्राजक्त तुमच्यात भरून उरतो. मग तो तुमचा असतो की तुम्ही त्याचे झालेले असता, याला उत्तर नाही. प्राजक्ताच्या गंधाला दाद मिळते तीही अशीच मनातल्या मनातली. ज्याची त्याची आपआपली. शूजित सरकार यांचा ऑक्टोबर असाच आहे. हा सिनेमा पाहताना यातली शिवली प्राजक्ताचं जणू फूल बनली आहे. आणि यातल्या एकमेव डॅनला या प्राजक्ताचा गंध कळला आहे. हा सिनेमा बघताना आपल्याला या सिनेमाच्या वेगाशी जुळवून घ्यावं लागतं आणि मग हलके हलके त्याचं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचतं. सिनेमाचा बाज असा आहेच. पण यात जी डॅन आणि शिवली यांच्या नात्याची गोष्ट आहे, तीही अशीच डॅन एका पंचतारांकित हॉटेलात इंटर्न म्हणून काम करतो. त्याच्यासोबत त्याच्या वर्गातले इतर मित्रही आहेत. त्यातलीच एक शिवली. ज्युनिअर असूनही डॅनच्या बॅचमध्ये तिची वर्णी लागली आहे. त्यामुळे डॅनला तिच्याबद्दल उगाच आकस आहे. त्याच्या छोट्या छोट्या कृतीतून ते दिसतं. पण शिवलीची डॅनबद्दल तशी भावना नाही. उलट सर्वांकडून सतत बोलणी खाणाऱ्या डॅनबद्दल तिला जरा उगाच सॉफ्ट कॉर्नर आहे. पण तिने तो कधीच बोलून दाखवलेला नाही. दिवसामागून दिवस जात असतानाच ३१ डिसेंबर येतो. सगळी मंडळी हॉटेलच्या गच्चीवर पार्टी करायला जातात. डॅन तिथे नाही. शिवलीही तिथे पोचते. डॅन कुठाय असा प्रश्न सहज विचारते आणि कट्ट्यावरुन तिचा तोल जातो. शिवली कोमात जाते. डॅनला नंतर हा प्रकार कळतो. तिने डॅनबद्दल विचारलेला शेवटचा प्रश्नही त्याला समजतो, मग मात्र त्याला उत्तर देण्यासाठी डॅन तिच्या हॉस्पिटलमध्ये जातो. तिथून या दोघांमधल्या अव्यक्त संवादाला सुरूवात होते. शूजित सरकार सतत सिनेमा या माध्यमाच्या नव्या शक्यतांचा शोध घेताना दिसतात. मद्रास कॅफे, पिकू, विकी डोनर आणि आता ऑक्टोबर.. प्रत्येक सिनेमा वेगळा. विषय वेगळा.. त्याची मांडणी वेगळी. यावेळी त्यांनी या मांडणीत कवितेची गेयता शोधली आहे. म्हणून हा सिनेमा एक काव्य बनतं. या दोघांचा नातेसंबंध सांगतानाही अनेक महत्वाच्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला आहे. आजच्या जगण्यात आलेली व्यावसायिकता, नातेसंबंधात वारंवार पाहिली जाणारी सोय, जपला जाणारा स्वार्थ आदी अनेक अदृश्य अंगांना हा दिग्दर्शक स्पर्श करतो. या सिनेमातला डॅन मनस्वी आहे. आपल्या मनाला काय वाटतं याच्याशी तो प्रामाणिक आहे. व्यवहाराची,व्यवसायाची गणितं त्याच्या डोक्यात नाहीत असा भाग नाही. पण त्याला काय वाटतं, त्याकडे तो लक्ष देतो. म्हणूनच भवताली वेढून असलेल्या संधीसाधू मैत्रीला प्रश्न विचारतो. हे सगळं घडत असताना, या सिनेमाच्या वेगाशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. समोर जे चालू आहे, त्यातून दिसणारा आणि निघणारा असे दोन अर्थ सतत पडताळून पाहावे लागतात. ही या सिनेमाची गंमत आहे. हे सांगताना फक्त, या सिनेमाचा वेग आणि त्यात घडणाऱ्या गोष्टी आणखी हव्या होत्या असं वाटत राहतं. या सिनेमाचा वेग थोडा वाढवता आला असता तर ही कविता किंचित प्रवाही झाली असती. सिनेमाच्या तांत्रिक अंगांबाबत शंका घेण्याचं कारण नाही. शंतनू मोईत्रा यांचं संगीत हे त्यातलं आणखी एक कॅरेक्टर. यात आवर्जून कौतुक करायला हवं ते वरूण धवन आणि बनिता संधू, गीतांजली राव यांचा अभिनय केवळ लाजवाब. स्टुडंट ऑफ द इयर, बद्रिनाथ की दुल्हनियासारखे सिनेमे करताना ऑक्टोबरसारखा चित्रपट करून त्याने आपली रेंज पुन्हा दाखवून दिली आहे. म्हणूनच या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये मिळतो लाईक. हा सिनेमा चांगला आहे. थोडा धीर.. थोडी शांतता.. मनी आणणं शक्य असेल तर या प्राजक्ताचा गंध ऊर भरून घ्यायला हवा.  आपल्या आजूबाजूला जागोजागी असे अनेक प्राजक्त असतात. फक्त आपल्याला ते नीट पाहता यायला हवेत.. प्राजक्तासारखी माणसं भले आपल्याला दिसत जरी नसली, तरी त्यांचं अस्तित्व आपल्याला कळायला हवं.. ही शांतता गरजेची असते ती त्यासाठी.

महत्त्वाच्या बातम्या

Gayatri Datar: गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
KBC 18: खिशात 24 रुपये अन् घर सोडलं; महाराष्ट्राचा लेक झाला करोडपती, KBCच्या एका प्रश्नानं नशीब पालटवलं; म्हणाला, आधी आईचे विकलेले दागिने घेणार
खिशात 24 रुपये अन् घर सोडलं; महाराष्ट्राचा लेक झाला करोडपती, KBCच्या एका प्रश्नानं नशीब पालटवलं; म्हणाला, आधी आईचे विकलेले दागिने घेणार
Sohel Khan Dies: नाश्ता केला अन् हॉटेलमध्ये आला हृदयविकाराचा झटका; शूटिंगदरम्यान अभिनेता सोहेल खानची प्राणज्योत मालवली, नेमकं काय घडलं?
नाश्ता केला अन् हॉटेलमध्ये आला हृदयविकाराचा झटका; शूटिंगदरम्यान अभिनेता सोहेल खानची प्राणज्योत मालवली, नेमकं काय घडलं?
Riteish Deshmukh Genelia: भरहॉटेलमध्ये रितेशच्या मांडीवर जेनेलिया बसली; नवऱ्याला प्रेमाने भरवला घास, नेटकरी म्हणाले, 'सोनिया अन् राजीव गांधी'
भरहॉटेलमध्ये रितेशच्या मांडीवर जेनेलिया बसली; नवऱ्याला प्रेमाने भरवला घास, नेटकरी म्हणाले, 'सोनिया अन् राजीव गांधी'

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Pune Flex: पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunetra Pawar and Supriya Sule: यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare on Konkan new district: कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
Naigaon Vasai News: आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Embed widget