Sonu Nigam : संविधानात कुठेही लिहिलेले नाही भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे; किच्चा सुदीपला सोनू निगमचे समर्थन
Sonu Nigam : हिंदी भाषा राष्ट्रभाषा आहे की नाही यावरुन अनेक सेलिब्रिटींमध्ये मतभेद होत आहेत.
Sonu Nigam : हिंदी सिनेसृष्टी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सध्या राष्ट्रभाषेच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाले आहेत. दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने म्हटले होते, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. यावर अजय देवगणने प्रत्यूत्तर देत म्हटले होते, जर हिंदी राष्ट्रभाषा नसेल तर साऊथ इंडस्ट्रीतील निर्माते त्यांचे चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करतात?. आता सोनू निगमनेदेखील राष्ट्रभाषेसंदर्भात भाष्य केले आहे.
सोनू निगमने राष्ट्रभाषेच्या वादावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे,भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे असे संविधानात कुठेही लिहिलेले नाही. हिंदी भाषा सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तर तामिळ ही सर्वात जुनी भाषा आहे.
And sir @ajaydevgn ,,
— Kichcha Sudeepa (@KicchaSudeep) April 27, 2022
I did understand the txt you sent in hindi. Tats only coz we all have respected,loved and learnt hindi.
No offense sir,,,but was wondering what'd the situation be if my response was typed in kannada.!!
Don't we too belong to India sir.
🥂
देशाची भाषा मनोरंजन : सोनू सूद
एका कार्यक्रमादरम्यान सोनू सूद म्हणाला, केवळ हिंदी भाषेलाच भारताची राष्ट्रभाषा म्हणता येणार नाही. देशाची एक भाषा आहे ती म्हणजे मनोरंजन. जर तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं तरच प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करतील. तुमच्या कलाकृतीला चांगला प्रतिसाद देतील.
Perfect response to Ajay Devgn by Sonu Nigam: Let's not divide people further in this country, where is it written that Hindi is our national language? 👏 pic.twitter.com/hC9nHbXJHy
— Sushant Mehta (@SushantNMehta) May 2, 2022
किच्चा सुदीपनेही अजय देवगणला उत्तर देत म्हटले आहे, मला जे म्हणायचे होते, ते चुकीच्या अर्थाने तुमच्यापर्यंत पोहोचले आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता. मी माझ्या देशातील प्रत्येक भाषेचा आदर करतो. मला हा वाद उगाच अजून वाढवायचा नाही. भेटून यावर नक्कीच बोलू’.
संबंधित बातम्या