Nita Ambani : नीता अंबानींच्या सौंदर्यामागे 'या' व्यक्तीचा हात; जाणून घ्या एका दिवसाला मेकअप आर्टिस्टवर किती रुपये खर्च करतात?
Nita Ambani : नीता अंबानी यांचा मेकअप मिक्की कॉन्ट्रॅक्टर (Mickey Contractor) करतो.
Nita Ambani Personal Makeup Artist : अंबानी कुटुंब (Ambani) हे देशातीलच नाही तर जगभरातील सर्वात प्रसिद्ध कुटुंब आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच नीता अंबानी यांनी देशातील सर्वात मोठ्या कलाकेंद्राची निर्मिती केली. 'नीता अंबानी कल्चरल सेंटर' असे या कलाकेंद्राचे नाव आहे. पण वयाच्या 59 व्या वर्षीदेखील नीता अंबानी (Nita Ambani) खूपच सुंदर दिसतात.
नीता अंबानी यांचं व्यक्तिमत्तव सर्वांना भूरळ पाडणारं आहे. सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सर्वांनाच नीता अंबानी यांच्या सौंदर्याची भूरळ पडली आहे. नीता अंबानी एक यशस्वी उद्योजिका असण्यासोबत उत्कृष्ट नृत्यांगणा आणि समाजसेविकादेखील आहेत. तीन मुलांची आई असूनही नीता अंबानी एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत.
नीता अंबानी यांचा मेकअप आर्टिस्ट कोण आहे?
नीता अंबानी आपल्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकत असतात. पण त्यांच्या सौंदर्यामागे मिक्की कॉन्ट्रॅक्टर (Mickey Contractor) या मेकअप आर्टिस्टचा मोठा हात आहे. मिक्की हा अंबानी कुटुंबियांचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे. नीता अंबानी यांचा मेकअप करण्यासोबत मिक्की ईशा अंबानी आणि श्लोका मेहता यांचादेखील मेकअप करतो.
View this post on Instagram
मिक्की कॉन्ट्रॅक्टर आधी टोक्योमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करत होता. त्यावेळी बॉलिवूड सुपरस्टार हेलनसोबत मिक्कीची भेट झाली. दरम्यान हेलनने मिक्कीला हिंदी मनोरंजनसृष्टीत काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हेलनच्या सांगण्यावरुन मिक्कीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
मिक्की कॉन्ट्रॅक्टर एका व्यक्तीचा मेकअप करण्यासाठी किती रुपये आकारतो? (Makeup Artist Mickey Contractor Salary)
मिक्की कॉन्ट्रॅक्टर आज भारतातील लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार,एका व्यक्तीचा मेकअप करण्यासाठी मिक्की कॉन्ट्रॅक्टर 75,000 ते 1 लाख रुपये आकारतो. मिक्की हा इंडस्ट्रीतला सर्वात महागडा मेकअप आर्टिस्ट आहे. एका महिन्यात तो कोट्यवधी रुपये कमावतो.
नीता अंबानी यांच्यासह 'या' सेलिब्रिटींचादेखील मिक्की करतो मेकअप
मिक्की अंबानी कुटुंबियांसह ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्मा यासेलिब्रिटींचादेखील मेकअप करतो. सेलिब्रिटींसह 'डॉन', 'दिल तो पागल है', 'कार्तिक कॉलिंग कार्तिक' आणि 'माय नेम इज खान' सारख्या सिनेमांसाठीदेखील मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे.
संबंधित बातम्या