एक्स्प्लोर

New Year 2023 : 'पठाण' ते 'आदिपुरुष'; नववर्षात प्रदर्शित होणाऱ्या सर्वोत्कृष्ट सिनेमांबद्दल जाणून घ्या...

Bollywood Movies : जाणून घ्या नववर्षात प्रदर्शित होणारे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे...

Bollywood Movies : नवीन वर्षात अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जाणून घ्या नववर्षात प्रदर्शित होणारे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे... 

1. कुत्ते (Kuttey) : विशाल भारद्वाजचा लेक म्हणजेच आसमान भारद्वाजचा आगामी 'कुत्ते' हा सिनेमा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 13 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

2. पठाण (Pathaan) : शाहरुख खानचा बहुचर्चित 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. शाहरुखसह या सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

3. मैदान (Maidaan) : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी 'मैदान' हा सिनेमा 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा सैय्यद अब्दुल रहीम यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अमित शर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

4. किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) : सलमान खानचा आगामी 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्यासह अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 

5. रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) : करण जौहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या या सिनेमात धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आजमी, रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. 

6. जवान (Jawan) : शाहरुख खानचा बहुचर्चित 'जवान' हा सिनेमा 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपथी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एटली कुमारने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

7. आदिपुरुष (Adipurush) : 'आदिपुरुष' हा बहुचर्चित सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा आहे. 16 जूनला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रामायणावर आधारित या सिनेमात सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान, कृती सेनन आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. मराठमोळ्या ओम राऊतने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

8. सत्यप्रेम की कथा (Satyaprem Ki katha) : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा 29 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समीर विद्वांसने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

9. टायगर 3 (Tiger 3) : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी 'टायगर 3' चा सिनेमा येत्या वर्षात 10 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साजिद खानने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सलमान खानसह कतरिना कैफ स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

10. डंकी (Dunki) : राजकुमार हिरानीचा 'डंकी' हा सिनेमा 22 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत.

संबंधित बातम्या

Animal First Look : रणबीर कपूरच्या 'Animal' सिनेमाची रिलीज डेट जाहीर; पोस्टर आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget