Netflix Gets Legal Notice: शोमध्ये माधुरी दीक्षितबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप, नेटफ्लिक्सला नोटीस
मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली आहे. बिग बँग थिअरी या प्रसिद्ध शोमध्ये माधुरी दीक्षितबाबत (Madhuri Dixit) आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप मिथुन विजय कुमार यांनी केला आहे.
Netflix Gets Legal Notice: बिग बँग थिअरी (Big Bang Theory) या प्रसिद्ध शोमधील एका एपिसोडमध्ये माधुरी दीक्षितबाबत (Madhuri Dixit) आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार (Mithun Vijay Kumar) यांनी केला आहे. या प्रकरणी मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला (Netflix) नोटीस पाठवली आहे. ही नोटीस पाठवून मिथुन विजय कुमार यांनी स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवरुन या शोमधील एक एपिसोड हटवण्याची मागणी केली आहे.
बिग बँग थिअरीच्या दुसऱ्या सिझनमधील पहिल्या एपिसोडमध्ये जिम पार्सन्स (Jim Parsons)यानं शेल्डम कूपर ही भूमिका साकारली आहे. जिम पार्सन्स हा शोमध्ये माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांची तुलना करतो. त्यानंतर तो माधुरीबाबत एक कमेंट करतो. या कमेंटवर आता मिथुन विजय कुमार यांनी आक्षेप घेतला आहे.
मिथुन विजय कुमार यांनी शेअर केलं ट्वीट
मिथुन विजय कुमार यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'काही दिवसांपूर्वी मी नेटफ्लिक्सवरील बिग बँग थिअरी या शोचा एक एपिसोड पाहिला. यामधील एक अभिनेता दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याबद्दल बोलताना आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरतो.'
पुढे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी लहानपणापासूनच माधुरी दीक्षित यांचा फॅन आहे. त्यामुळे बिग बँग थिअरीमधील तो डायलॉग ऐकून मला वाईट वाटलं. भारतीय संस्कृती आणि स्त्रियांचा अपमान केल्यासारखं वाटलं. म्हणून मी माझ्या वकिलाला नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवण्यास सांगितले, मी त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरून तो एपिसोड काढून टाकण्याची विनंती केली. नेटफ्लिक्स हे प्रकरण गांभीर्याने घेईल, ही आशा व्यक्त करतो.'
Recently, I came across an episode of the show Big Bang Theory on Netflix where Kunal Nayyar's character uses an offensive and derogatory term to refer to the legendary Bollywood actress @MadhuriDixit. As a fan of Madhuri Dixit since childhood, I was deeply disturbed by the… pic.twitter.com/pvRCKd5Ne4
— Mithun Vijay Kumar (@MVJonline) March 22, 2023
मिथुन विजय कुमार यांच्या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. आता नेटफ्लिक्स या प्रकरणी काय कारवाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: