March OTT Release : 'पठाण' ते 'चोर निकल के भागा'; 'या' आठवड्यात सिनेप्रेमींना घरबसल्या मिळतेय मनोरंजनाची मेजवानी
Movies : सिनेप्रेमींना मार्च महिन्यातील या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. अनेक चांगले सिनेमे या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत.
New OTT Release Movie : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मची क्रेझ गेल्या काही दिवसांत चांगलीच वाढली आहे. चांगल्या दर्जाचे सिनेमे घरबसल्या पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. मार्च महिन्यातला हा आठवडा प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 'पठाण'सह (Pathaan) यामी गौतमच्या (Yami Gautam) 'चोर निकल के भागा'पर्यंत (Chor Nikal Ke Bhaga) अनेक सिनेमे प्रेक्षकांना ओटीटीवर पाहायला मिळत आहेत.
पठाण (Pathaan) : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. सध्या हा बहुचर्चित सिनेमा ट्रेडिंगमध्ये आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला आता चाहते पसंती दर्शवत आहेत.
चोर निकल के भागा (Chor Nikal Ke Bhaga) : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा (Yami Gautam) 'चोर निकल के भागा' (Chor Nikal Ke Bhaga) हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
हंटर (Hunter) : हिंदी सिने-सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) 'हंटर' (Hunter) हा सिनेमा प्रेक्षक प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. सुनील शेट्टी सिनेमातील एक वेगळा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
रेगी (Raggie) : अनेक पुरस्कार सोहळ्यात गौरवलेला 'रेगी' हा सिनेमा प्रेक्षकांना प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. एमी पुरस्कार विजेते अलेक्जेंड्रिया स्टेपलटनने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
पूवन (Poovan) : 'पूवन' हा मल्याळम सिनेमा सिनेप्रेमी 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. हा विनोदी सिनेमा घरातील सर्व कुटुंबियांसोबत प्रेक्षक पाहू शकतात.
'भोला' आणि 'गॅसलाइट' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!
भोला (Bholaa) : अजय देवगणच्या 'भोला' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमात अजयसह तब्बूदेखील (Tabu) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील अजयने सांभाळली आहे. 'कैथी' या तामिळ सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे.
'गॅसलाइट' (Gaslight) : सारा अली खानच्या 'गॅसलाइट' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्य, थ्रील, रहस्य अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात सारासह विक्रांत मेस्सी आणि चित्रागंदा सिंहदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
संबंधित बातम्या