एक्स्प्लोर
ऋषी कपूरना कॅन्सर झाल्याचे नीतू सिंग यांचे संकेत?
'हॅपी 2019, कोणतेही संकल्प नाहीत, यावेळी फक्त शुभेच्छा. प्रदूषण आणि ट्राफिक कमी होऊदे. भविष्यात 'कॅन्सर' ही फक्त रास राहूदेत. कोणतेही द्वेष नको, गरीबी नको, खूप सारं प्रेम, सर्वांची सोबत, आनंद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुदृढ आरोग्य' अशा आशयाची पोस्ट नीतू सिंग यांनी केली आहे.
मुंबई : प्रख्यात अभिनेते ऋषी कपूर यांनी पत्नी आणि अभिनेत्री नीतू सिंग, मुलगा-अभिनेता रणबीर कपूर, मुलगी, जावई आणि अभिनेत्री आलिया भट यांच्यासोबत 31 डिसेंबर अत्यंत जल्लोषात साजरा केला. मात्र दुसऱ्या दिवशी नीतू सिंग यांनी केलेल्या पोस्टला काहीशी दुःखाची किनार आहे. नीतू सिंग यांची इन्स्टाग्राम पोस्ट पाहून ऋषी कपूर यांना कर्करोगाने ग्रासलं आहे का, अशा बुचकळ्यात चाहते पडले आहेत.
न्यूयॉर्कमध्ये ऋषी कपूर, नीतू सिंग, रणबीर, आलिया, रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी, तिचे पती भरत साहनी आणि कन्या समारा यांनी नववर्षाचं स्वागत केलं. कपूर कुटुंबीय सेलिब्रेशन्सचे फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असतात. मग त्या करिना-करिष्मा असोत, वा नीतू सिंग. नीतू यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये सर्वांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत आहे. मात्र या हसऱ्या चेहऱ्यामागे कुठलं तरी दुःख दडल्याचे संकेत मिळत आहेत.
'हॅपी 2019, कोणतेही संकल्प नाहीत, यावेळी फक्त शुभेच्छा. प्रदूषण आणि ट्राफिक कमी होऊदे. भविष्यात 'कॅन्सर' ही फक्त रास राहूदेत. कोणतेही द्वेष नको, गरीबी नको, खूप सारं प्रेम, सर्वांची सोबत, आनंद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुदृढ आरोग्य' अशा आशयाची पोस्ट नीतू सिंग यांनी केली आहे.
यापूर्वी ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याच्या अफवा बंधू रणधीर कपूर यांनी धुडकावल्या होत्या. नेमकं निदान झाल्याशिवाय कुठलंही भाष्य करणं योग्य नसल्याचं ते म्हणाले. वैद्यकीय उपचारांमुळे ऋषी कपूर त्यांची आई कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित नव्हते.
रिद्धीमा साहनी यांनीही "ऋषी कपूर यांची प्रकृती उत्तम आहे. काळजी करण्याचं कारण नाही. खरं तर त्यांच्या आरोग्याबद्दल मी कधीही चिंतेत नव्हते. ते फक्त रुटीन टेस्ट करत आहेत, जे त्यांनी ट्विटरवर सांगितलं होतं. ते अनेक वर्षांपासून आपल्या सर्व तपासण्या करत आहेत. सगळं काही व्यवस्थित होईल, असा विश्वास आम्हाला आहे." असं म्हटलं होतं.
'रातोरात माझे केस राखाडी/पांढरे झाल्यामुळे काही अफवा माझ्याबाबत फिरत आहेत. हनी त्रेहान आणि सोनी पिक्चर्सची निर्मिती असलेल्या एका सिनेमासाठी अॅवन काँट्रॅक्टरने माझे केस रंगवले आहेत. हितेश भाटिया दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही.' असं ट्वीट ऋषी कपूर यांनी ऑक्टोबर महिन्यात केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement