एक्स्प्लोर
नीरजा भानोतचे कुटुंबीय 'नीरजा' चित्रपट निर्मात्यांविरोधात कोर्टात
नवी दिल्ली : दिवंगत एअर हॉस्टेस नीरजा भानोतचे कुटुंबीय राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'नीरजा' चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात कोर्टात गेले आहेत. भानोत कुटुंबीयांनी निर्मात्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे.
नीरजावर सिनेमा करण्याची परवानगी जेव्हा निर्मात्यांना देण्यात आली, तेव्हा (2 सप्टेंबर 2013) भानोत कुटुंबासोबत एक करार करण्यात आला होता. या करारानुसार निर्मात्यांनी साडेसात लाख रुपयांची रक्कम आणि चित्रपटाला झालेल्या नफ्याच्या 10 टक्के रक्कम देण्याचं ठरलं होतं, असा दावा भानोत कुटुंबीयांनी केला आहे.
ब्लिंग अनप्लग्ड आणि फॉक्स स्टार स्टुडिओज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे ठरल्याप्रमाणे पैसे द्यायला तयार नसल्याने केस दाखल केल्याचं नीरजाच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे पंजाब आणि हरियाणा कोर्टाचे दरवाजे भानोत कुटुंबीयांनी ठोठावले.
नीरजा चित्रपटाच्या निर्मितीसाठी 21 कोटी रुपयांचा खर्च आला होता, तर मार्केट रिपोर्ट्सनुसार या ब्लॉकबस्टर चित्रपटाने 135 कोटींची कमाई केली.
5 सप्टेंबर 1986 रोजी पाकिस्तानातील कराची विमानतळावर पॅन अॅम एअरलाईन्सचं फ्लाईट हायजॅक करण्यात आलं होतं. सर्व प्रवाशांचे प्राण तिने मोठ्या शिताफीने वाचवलेच, तर एका लहानग्याला वाचवण्यासाठी शूर एअरहॉस्टेस नीरजा भानोतने दहशतवाद्यांच्या गोळ्या झेलल्या आणि तिचा मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement