Neeraj Chopra: 'आम्हाला तुझा अभिमान आहे'; गोल्डन बॉय नीरज चोप्राचं बॉलिवूड कलाकारांनी केलं अभिनंदन
Neeraj Chopra: काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन नीरजचं अभिनंदन केलं आहे.
Neeraj Chopra: भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक भालाफेक स्पर्धेत (World Javelin Championships Updates) 88.17 मीटरपर्यंत भालाफेकत सुवर्ण पदक पटाकवले आहे. तो जागतिक भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे. सध्या अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून नीरजचं कौतुक करत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन नीरजचं अभिनंदन केलं आहे.
करीना कपूर खान, शाहिद कपूर, आयुष्मान खुराना, फरहान अख्तर, मलायका अरोरा, अभिषेक बच्चन, भूमी पेडणेकर यांसारखे बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन नीरजचं अभिनंदन केले आहे.
अभिनेत्री करीना कपूर खाननं नीरजचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन लिहिलं, 'नीरज चोप्रा, आम्हाला तुझा अभिमान आहे.'
अभिनेता शाहिद कपूरनं पोस्ट शेअर करुन लिहिलं, 'आमच्या वर्ल्ड चॅम्पियनचे अभिनंदन'
अभिनेता अमिताभ बच्चननं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन नीरजला शुभेच्छा दिल्या आहेत.त्यानं नीरजचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला.
2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकलं होतं. आता जागतिक स्पर्धेत पुन्हा सुवर्ण कामगिरी करत नीरजनं भारताचा झेंडा आणखी उंचवला आहे.
View this post on Instagram
हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या (अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप) World Athletics Championship 2023 मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले.
View this post on Instagram
नीरज चोप्राने ऑलिम्पिकशिवाय डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचबरोबर आता नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून मोठा विक्रम केला आहे.
मात्र 4x400 मीटर रिले शर्यतीत भारतीय खेळाडूंनी निराशा केली. 4x400 मीटर रिले शर्यतीत भारत पाचव्या स्थानावर राहिला. या शर्यतीत अमेरिकेने सुवर्णपदक जिंकले. तर फ्रान्सने रौप्यपदक जिंकले.
महत्त्वाच्या बातम्या :
Neeraj Chopra : भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!