NCB Drug Case Investigation | बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीकडून पुन्हा समन्स, 16 डिसेंबरला चौकशी
NCB Drug Case Investigation : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याचंही नाव ड्रग केसमध्ये समोर आलं होतं. यासंदर्भात त्याची चौकशीही करण्यात आली होती. आता एनसीबीने पुन्हा एकदा अर्जुन रामपाल समन्स बजावलं आहे.
NCB Drug Case Investigation : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याचंही नाव ड्रग केसमध्ये समोर आलं होतं. यासंदर्भात त्याची चौकशीही करण्यात आली होती. आता एनसीबीने पुन्हा एकदा अर्जुन रामपाल समन्स बजावलं आहे. एनसीबीने 16 डिसेंबर रोजी अर्जुन रामपालला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ड्रग कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची याआधी चौकशी झाली करण्यात आली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूड ड्रग कनेक्शन समोर आलं होतं. सध्या एनसीबी याप्रकरणी कसून तपास करत आहे.
अर्जुन रामपाल व्यतिरिक्त त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाची देखील एनसीबीने सलग दोन दिवस 6-6 तासांसाठी चौकशी केली होती. एनसीबीने गेल्या महिन्यात अभिनेता अर्जुन रामपालच्या घराचीही झडती घेतली होती. त्यानंतर अर्जुनला एनसीबीच्या ऑफिसमध्ये बोलावलं होते. झडती दरम्यान एनसीबीला अर्जुनच्या घरी ड्रग्ज सापडल्या नव्हत्या.
दरम्यान, एनसीबीने काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालच्या वांद्र्यातील घराची झडती घेतली होती. त्यावेळी एनसीबीने अर्जुनच्या घरातून त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टॅब जप्त केला होता. त्यावेळी अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रायडिसला चौकशीची नोटीस देण्यात आली होती. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलवूडचे ड्रग्ज संबंध चव्हाट्यावर आले होते. त्यासंबंधी एनसीबी सध्या कसून तपास करत आहे.
पाहा व्हिडीओ : अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीचं पुन्हा समन्स
कोणत्याही निर्दोष व्यक्तीची प्रतिष्ठा धुळीस मिळवणे ही वाईट गोष्ट : अर्जुन रामपाल
अर्जुन रामपालची याआधीही चौकशी करण्यात आली होती. एनसीबीच्या चौकशीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अर्जुन रामपालने सांगितले होते की, "कोणत्याही निर्दोष व्यक्तीची प्रतिष्ठा धुळीस मिळवणे ही वाईट गोष्ट आहे. माझे या ड्रग्ज प्रकरणाशी कोणतेही देणे-घेणे नाही. परंतु या प्रकरणासंबंधी एनसीबी जे काम करत आहे ते योग्य आहे." त्याने पुढे सांगितले की, "एनसीबी ज्या प्रकरणाशी संबंधीत तपास करत आहे, त्या प्रकरणाशी माझा काही संबंध नसल्याची खात्री एनसीबीला झाली आहे. माझ्या घरात जे औषध एनसीबीला मिळाले आहे. त्याचे प्रिस्कीप्शन माझ्याकडे आहे आणि ते मी एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. या प्रकरणासंबंधीच्या तपासाला माझे पूर्ण सहकार्य आहे."
महत्त्वाच्या बातम्या :