Nayanthara-Vignesh : नयनतारा अन् विग्नेश लग्नाच्या चार महिन्यांतच पालक कसे झाले? तामिळनाडू सरकार सरोगेसीची चौकशी करणार
Nayanthara-Vignesh : साऊथ अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी आपण आई-वडील झाल्याची आनंदाची बातमी शेअर करत सर्वांनाच चकित केले आहे.

Nayanthara-Vignesh : साऊथ अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी आपण आई-वडील झाल्याची आनंदाची बातमी शेअर करत सर्वांनाच चकित केले आहे. विग्नेशने त्यांच्या जुळ्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहेत. मात्र, ही बातमी आल्यानंतर नयनताराचा बेबी बंप दिसला नसल्याने चाहते आश्चर्यचकित झाले. यानंतर चाहत्यांनी सरोगसी किंवा मूल दत्तक घेतल्याच्या अटकळी बांधण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी या बाबतीत वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. मात्र, अनेक कायदेतज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले की, काही ठराविक प्रकरणे वगळता भारतात जानेवारीपासून सरोगसी बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात तामिळनाडू सरकार चौकशी करणार आहे.
या स्टार जोडप्याला लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच मुले झाल्याबद्दल सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावरील या वादानंतर नयनतारा आणि विग्नेश सरकारच्या निशाण्यावर आले आहेत. तामिळनाडू सरकारने या जोडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
नयनतारा आणि विग्नेश यांनी नियमांचे उल्लंघन केले?
अभिनेत्रीने अधिकृतरीत्या जाहीर केले नसले, तरी नयनतारा आणि विग्नेश यांनी सरोगसीच्या माध्यमातून पालकत्व स्वीकारल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे. लग्नाआधीच त्यांनी हे नियोजन केले होते का?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, दुसरीकडे सरोगसीसंदर्भातील कायद्याबाबत अनेकजण चर्चा करत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही विशेष प्रकरणे वगळता, जानेवारी 2022पासून देशात सरोगसी बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे नयनतारा आणि विग्नेश यांनी नियमांचे उल्लंघन केलेले असू शकते.
तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
काही विशेष प्रकरणे वगळता देशात जानेवारी 2022 पासून सरोगसी बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. या प्रकरणी बोलताना सोमवारी पत्रकार परिषदेत तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एमए सुब्रमण्यम म्हणाले की, 'या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि सरकार या जोडप्याकडून उत्तरही मागणार आहे. सरोगसी हा स्वतःच एक मोठा वादाचा विषय आहे, परंतु, कायद्याने त्याच लोकांना सरोगसीचा अवलंब करण्याची परवानगी आहे, ज्यांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 36 वर्षांपेक्षा कमी असेल. यामध्ये कुटुंबीयांचीही मान्यता घेतली जाते.
डिसेंबर 2021मध्ये देशभरात ‘सरोगसी कायदा 2021’ मंजूर झाला आणि 25 जानेवारी 2022पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली. या कायद्या अंतर्गत व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती, केवळ परोपकारी सरोगसीला परवानगी होती. ‘परोपकारी सरोगसी’ म्हणजे ज्यामध्ये सरोगेट आई पैसे घेणार नाही, फक्त तिला याचा वैद्यकीय खर्च आणि जीवन विमा द्याव लागतो.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
