एक्स्प्लोर
'ठाकरे' सिनेमात राज-उद्धव नव्हे; साळवी, जोशींना महत्त्वाचं स्थान!
आता बाळासाहेबांची व्यक्तिरेखा नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार, तर मग इतर भूमिका करणार कोण याकडे लक्ष लागलंच असेल की.

मुंबई : चित्रपटरसिकांमध्ये सध्या ‘ठाकरे’ या सिनेमाची जास्त उत्सुकता आहे. तुमच्या-आमच्या जिव्हाळ्याच्या आणि जवळच्या माणसावर सिनेमा बनवण्याचं शिवधनुष्य पेललंय खासदार संजय राऊत यांनी. तर दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी अभिजीत पानसे यांच्यावर सोपवली आहे.
आता बाळासाहेबांची व्यक्तिरेखा नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार, तर मग इतर भूमिका करणार कोण याकडे लक्ष लागलंच असेल की. म्हणजे, राज- उद्धव यांच्यासह मीनाताई, मनोहर जोशी, पवार साहेब अशा सगळ्या महत्त्वाच्या भूमिकांसाठी कोणाकोणाला कास्ट केलंय याची तुम्हाला उत्सुकता असेलच ना.
ठाकरे सिनेमाचं चित्रीकरण सध्या जोरात सुरु आहे. म्हटल्याप्रमाणे खूप साऱ्या व्यक्तिरेखा आहेत या सिनेमात. हा सिनेमा घडणार आहे तो शिवसेनेच्या स्थापनेच्या काळात. त्यामुळे यात दत्ता साळवी आहेत, मनोहर जोशी, कृष्णा देसाई ही मंडळी मात्र महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
बाळासाहेबांच्या भूमिकेनंतर या सिनेमात सगळ्यात मोठा रोल आहे तो दत्ता साळवींचा. त्यांची भूमिका या सिनेमात वठवणार आहे अभिनेता, लेखक प्रवीण तरडे. या भूमिकेसाठी आपल्या अतीप्रिय अशा मिशीची आहुती प्रवीणने दिली आहे. यात कृष्णा देसाई साकारत आहेत, संजय नार्वेकर. तर मनोहर जोशींची भूमिका करणाऱ्या कलाकाराचं नाव ऐकाल तर थक्क व्हाल. कारण ही भूमिका साकारतोय संदीप खरे.
आता उरला प्रश्न मीनाताईंची भूमिका यात नेमकी कोण करतेय याचा. आपल्याकडे आलीय बातमी, पण ते सरप्राईज ठेवणार आहोत. हिंट अशी की, हिंदीतली एक गोड अभिनेत्री तो रोल करते आहे.
शिवसेनेच्या स्थापनेच्या काळातला हा सिनेमा असल्यामुळे यात उद्धव-राज या व्यक्तिरेखा अत्यंत छोट्या आहेत. आता उगाच भलत्या शंका मनात आणू नका. सिनेमाचा विषय वेगळा आहे, म्हणून त्यानुसार याची पटकथा लिहिली आहे.
संबंधित बातम्या
बाळासाहेबांवरील 'ठाकरे' सिनेमातील भूमिका खूपच टफ : नवाजुद्दीन
... म्हणून बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनची निवड : संजय राऊत
पाहा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
