एक्स्प्लोर

'मंटो'च्या प्रेमापोटी दिग्गजांचं मोफत काम, नवाझने फक्त एक रुपया घेतला

ऋषी कपूर, परेश रावल, रणवीर शौरी, दिव्या दत्ता आणि जावेद अख्तर यांनी मानधन घेतलं नाही. तर नवाझने फक्त एक रुपया घेतला, अशी माहिती दिग्दर्शक नंदिता दास यांनी दिली.

मुंबई : आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने विविध भूमिकांना न्याय दिला आहे. त्याची सीक्रेड गेम्स ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. यानंतर एका नव्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडण्यासाठी सज्ज आहे. उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित सिनेमात नवाझुद्दीन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नंदिता दास दिग्दर्शित या सिनेमाबाबत असं बोललं जातंय, की या सिनेमात काम करण्यासाठी अनेक कलाकारांना मानधन घेतलेलं नाही. नंदिता दास एका मुलाखतीत म्हणाल्या, की “नवाझने या सिनेमात काम करण्यासाठी फक्त एक रुपया घेतला. सर्वच कलाकारांनी याचप्रकारे पाठिंबा दिला तेव्हा मी हैराण झाले. ऋषी कपूर, परेश रावल, रणवीर शौरी, दिव्या दत्ता आणि जावेद अख्तर यांनी मानधन घेतलं नाही. ऋषी कपूर यांनी या गोष्टीचे संकेत तर पहिल्या भेटीतच दिले होते. परेश रावल यांनी माझ्यासोबत याअगोदरही काम केलेलं आहे. कॅमेऱ्याच्या मागे चांगल्या कलाकाराबाबत असं म्हटलं जाऊ शकतं की, तो चांगल्या कामासाठी नेहमीच उत्सुक असतो.” नंदिता दास यांनी पुढे सांगितलं, की “जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचं मूल्य पैशांपेक्षा अधिक आहे. एखादं आवडीचं काम, जे तुम्हाला अनुभव आणि आनंद देतं, ते पैशांपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. मी स्वतः अशा अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे आणि पैशांकडे लक्षही दिलेलं नाही.” नवाझला मुख्य भूमिकेत घेण्याबाबत नंदिता दास यांनी या अगोदरही सांगितलेलं आहे. “नवाझचं व्यक्तिमत्त्व आणि मंटो यांची भूमिका मिळतीजुळती आहे. मंटो यांचा दृष्टीकोन, अभ्यास, राग, संवेदनशीलता, हसरा स्वभाव या सर्व गोष्टी नवाझमध्ये दिसतात आणि तो ही भूमिका निभावण्यासाठी सक्षम आहे,” असं नंदिता दास सांगतात. नंदिता दास दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर 15 ऑगस्टला रिलीज करण्यात आला होता. प्रेक्षकांनी ट्रेलरला चांगलीच पसंती दिल्याचं चित्र आहे. सिनेमा 21 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. पाहा ट्रेलर

महत्त्वाच्या बातम्या

ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
Shreya Kalra Lock Upp Season 2 Winner: श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget