Navya Naveli Nanda On Aaradhya Bachchan : ''इतक्या लहान वयात ती...''; ऐश्वर्या-अभिषेकच्या आराध्याबाबत नव्या नंदाच्या वक्तव्याने चाहते हैराण
Navya Naveli Nanda On Aaradhya Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा असताना नव्या नंदाचा पॉडकास्ट चर्चेत आहे. आता नव्या नंदाने ऐश्वर्या-अभिषेकची लेक आराध्याबाबत केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
Navya Naveli Nanda On Aaradhya Bachchan : बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नंदा (Navya Naveli Nanda) हिने फार कमी वयातच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिग बीची नात असली तरी नव्या नंदा अद्याप बॉलिवूडच्या कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. त्याशिवाय, तिने बॉलिवूडमध्ये काम करण्याची फारशी इच्छाही दाखवली नाही. तर, दुसरीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा असताना नव्या नंदाचा पॉडकास्ट चर्चेत आहे. आता नव्या नंदाने ऐश्वर्या-अभिषेकची लेक आराध्याबाबत (Aaradhya Bachchan) केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
आराध्याबाबत काय म्हणाली नव्या नवेली नंदा?
नव्या नंदा ही एक बिझनेस वुमन आहे. वडिलांसोबत ती व्यवसाय सांभाळते. नव्या ही तिच्या पॉडकास्ट शो 'व्हॉट द हेल नव्या?' च्या दुसऱ्या सीझनमुळेही ती चर्चेत आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये नव्याची आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन सहभागी झाल्या होत्या. आता अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना नव्याने तिची मामे बहीण आराध्याबद्दल दिलखुलासपणे मत व्यक्त केले आहे.
View this post on Instagram
नव्याच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन नंदा आणि स्वतःच्या तीन पिढ्या महिला आहेत. विशेष म्हणजे बच्चन कुटुंबात नव्याची पहिली मामे बहीण आराध्या बच्चन ही तिच्यापेक्षा एक पिढीने लहान आहे. नव्याला विचारण्यात आले की तिला तिच्या छोट्या बहिणीसाठी काही सल्ला आहे का? तेव्हा नव्याने सांगितले की, आराध्या ही तिच्या वयात माझ्यापेक्षा अधिक समजूतदार आहे.
View this post on Instagram
मी आराध्याला काय सल्ला देऊ?
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदाने पुढे सांगितले की, सध्याची मुले आमच्यापेक्षा खूपच पुढे आहेत. मी त्यांच्या वयाची असताना इतकी समजूतदार नव्हती. त्यामुळे मला वाटतं की आजची जनरेशन खूपच मजबूत असून त्यांना जग बदलायचे आहे. त्यामुळे आराध्याला मी काय सल्ला देऊ असे विचारत मीच तिच्याकडून खूप काही शिकते असे नव्याने सांगितले.