(Source: Poll of Polls)
Nana Patekar : नाना पाटेकर आणि गँगस्टर मन्या सुर्वेचा संबंध काय? तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर नानांचे जुने वक्तव्य व्हायरल
Nana Patekar Manya Surve Relation : मी अभिनेता झालो नसतो तर गँगस्टर झालो असतो असं नाना पाटेकर एका मुलाखतीत म्हटले होते. तसेच त्यांनी गँगस्टर मन्या सुर्वेसोबत असलेल्या संबंधावरही प्रकाश टाकला.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या नव्या आरोपांवरून आता पुन्हा एकदा राळ उडण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांपासून माझ्याच घरी मला त्रास दिला जातोय, माझ्यावर पाळत ठेवली जातेय, जीवही घेण्याचा प्रयत्न केला जातोय असे आरोप तनुश्री दत्ताने केले आहेत. यामागे नाना पाटेकर आणि त्यांची गँग असल्याचा आरोप तिने केला. नाना पाटेकरांच्या मागे संपूर्ण व्यवस्था आणि गुंडप्रवृत्तीचे लोक असल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला. तसेच त्यांचे गँगस्टरशी संबंध असल्याचा आरोपही तिने केला.
मी अभिनेता झालो नसतो तर गँगस्टर झालो असतो असं नाना पाटेकरांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्याची आठवण तनुश्री दत्ताने करुन दिली. त्यामुळे नाना पाटेकरांच्या मागे संपूर्ण व्यवस्था असून त्या माणसाच्या अहंकारामुळे आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोपही तिने केला.
Nana Patekar Manya Surve Relation : नाना पाटेकर आणि मन्या सुर्वेचा संबंध काय?
तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनंतर आता नाना पाटेकरांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, मन्या सुर्वे हा माझा भाऊ होता. आपले मामा आणि मामे भाऊ हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं नाना पाटेकर यांनी सांगितलं आहे.
गँगस्टर मन्या सुर्वेशी असलेले नातेसंबंध नाना पाटलांनी याआधी स्वतः सांगितलं आहे. मन्या सुर्वे हा नाना पाटेकरांचा मामेभाऊ होता. नाना पाटेकर यांच्या आईंचा भाऊ हा रमण सुर्वे. तेही गुंडप्रवृत्तीचे होते. त्यांचा मुलगा हा मन्या सुर्वे. मामा आणि मामेभाऊ मन्या सुर्वे सारखं आम्हीही होऊ नये म्हणून आपल्या आईने मुरुडला नेल्याचं नाना पाटेकरांनी सांगितलं.
मन्या सुर्वे हा मुंबईतील कुख्यात गँगस्टर होता. नंतर पोलिसांनी त्याचा एन्काऊंटरही केला.
Tanushree Dutta Allegations On Nana Patekar : तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर गंभीर आरोप
भारतात #MeToo चळवळीची सुरुवात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगत आहेत की, गेल्या 4-5 वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरात छळ होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. तसेच घरात मानसिक त्रासाला तसेच शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. तसेच नाना पाटेकर आणि गँग त्रास देत असल्याचा आरोपही तनुश्रीने केला.
ही बातमी वाचा :



















