Nana Patekar: नाना पाटेकर पाठवत आहेत लाखो चाहत्यांना पत्रं! तुमच्या घरी पत्र आलं असेल तर...
Nana Patekar: नाना पाटेकर (Nana Patekar) हे त्यांच्या लाखो चाहत्यांना पत्र लिहित आहेत. हे पत्र आता कोणाकोणाला मिळणार? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.
Nana Patekar: प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे सध्या त्यांच्या ओले आले (Ole Aale) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सध्या नाना हे त्यांच्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. नाना पाटेकर हे त्यांच्या लाखो चाहत्यांना पत्र लिहित आहेत. हे पत्र आता कोणाकोणाला मिळणार? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.
काय म्हणाले नाना पाटेकर?
सिद्धार्थ चांदेकरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, "माझ्या थोड्याफार अनुभवातून मला एक उमगलं आहे. आपलं आयुष्य हे गणितासारखं असतं. माणसांची बेरीज, आनंदाचा गुणाकार, दु:खाचा भागाकार आणि वेळेची वजाबाकी. माझं आणि माझ्या मुलाचं समीकरण वेगळं आहे. त्याच्यासाठी मी लसावी म्हणजेच लघुत्तम साधारण विभाजक आणि माझ्यासाठी तो मसावी महत्तम साधारण विभाजक. माणसानी आनंदात राहायचं, आनंद वाटत राहायचं, वर्तमान जगायचं. पत्र लिहितोय तुम्हाला, कशासाठी माहितीये का? 5 तारखेला आमचा ओले आले सिनेमा येतोय. पब्लिसीटी चालू आहे. हिंदी सिनेमांसारखं आमचं मोठं बजेट नाही. जेवढं आहे, तेवढ्यात भागवायचं. आमची दिवळीसुद्दा कशी असते माहितीये का? मोटरसायकल आणायची सायलेन्सर काढायचा त्याच्या तीन लिटर पेट्रोल भरायचं किक मारायची आणि एक्सिलेटर देऊन तीन तास फटफट... झाली दिवळी. बजेट नाही! त्यामुळे मला सांगा तुम्हाला शेवटचं पत्र कधी आलं? नाही आठवत नाय़ भारत पोस्टकडून आलेलं पत्र म्हणजे आनंद आहे. पाच जानेवारीला ओले आले थिएटरमध्ये येत आहे. त्यासाठी कधीपासून एकटाच बसून पत्र लिहित आहे. नक्की या!"
तुमच्या घरी नानांचे पत्र आलं तर...
नाना पाटेकर यांच्या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, "महाराष्ट्राचे लाडके नाना सध्या पाठवत आहेत त्यांच्या लाखो चाहत्यांना पत्रं! जर तुमच्याही घरी त्यांचं पोस्टकार्ड आलं असेल तर त्याचा फोटो share करा आणि @oleaalethefilm ला tag करा!" आता नानांचे हे पत्र कोणाकोणाला मिळणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
ओले आले हा चित्रपट पाच जानेवारीला रिलीज होत आहे. या चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासोबतच सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या: