Nana Patekar : नाना पाटेकरांचं मनोरंजनसृष्टीत कमबॅक; प्रकाश झा यांच्या 'लाल बत्ती' सीरिजमधून करणार ओटीटीवर पदार्पण
Nana Patekar : प्रकाश झा यांच्या आगामी सीरिजमधून नाना पाटेकर कमबॅक करणार आहेत.
Nana Patekar Laal Batti Web Series : मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करणारे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून गायब आहेत. पण आता बॉलिवूडचे माफिया नाना पाटेकर प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या आगामी सीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून ते मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. पण आता लवकरच ते प्रकाश झा यांच्या आगामी 'लाल बत्ती' (Laal Batti) या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणारी ही वेबसीरिज आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून राजकारणातील काही काळी सत्य उघडकीस येणार आहेत.
Laal Batti: Nana Patekar's debut web series after the MeToo scandal ropes in THIS famous TV actress? [Exclusive]
— Bollywood Life (@bollywood_life) November 8, 2022
#BobbyDeol #EntertainmentNews #LaalBatti #MeghanaMalik #MeghnaMalik
https://t.co/9MwyD2BJbh
वकिलाच्या भूमिकेत दिसणार नाना!
रिपोर्टनुसार, 'लाल बत्ती' या वेबसीरिजमध्ये नाना वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर मेघना मलिक या वेबसीरिजमध्ये नाना पाटेकर यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याआधी ती 'मिर्झापूर', 'अरण्यक' आणि 'बंदिश डाकू' या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'अनेक' सिनेमात मेघना झळकली होती.
नाना पाटेकरांचं ओटीटी विश्वात पुनरागमन!
नाना पाटेकर दोन वर्षानंतर प्रकाश झा यांच्या 'लाल बत्ती' या वेबसीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत. तसेच या वेबसीरिजद्वारे ते ओटीटी विश्वात पुनरागमन करणार आहेत. प्रकाश झा आणि नाना पाटेकर दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. यापूर्वी दोघांनी 'राजनीती' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. 'लाल बत्ती' वेबसीरिजमध्ये नानांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.
नाना पाटेकरांनी अनेक हिंदी-मराठी सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. त्यांच्या काही डायलॉगवर आजही चाहते मिमिक्री करतात. ते केवळ अभिनेतेच नाहीत तर लेखक आणि सिने-निर्मातेही आहेत. खास संवाद शैलीसाठी ते विशेष ओळखले जातात. मनोरंजनसृष्टीत काम करण्यासोबत नानांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला आहे.
संबंधित बातम्या