एक्स्प्लोर

नागा चैतन्यसोबत गुपचूप साखरपुडा करण्याचं नेमकं कारण काय? प्रेग्नेंसीबद्दल शोभिता धुलिपालाची प्रतिक्रिया समोर

Sobhita Dhulipala On Engagement : अभिनेता नागाचैतन्यने गेल्या महिन्यात शोभिता धुलिपालासोबत गुपचूप साखरपुडा केला होता. आता शोभिताने त्यांच्या नात्याबद्दल पहिल्यांदा चर्चा केली आहे.

Sobhita Dhulipala On Engagement : अभिनेत्री समंथा रुत प्रभू हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या बातम्या येत होत्या. त्यानंतर गेल्या महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला. 8 ऑगस्ट 2024 रोजी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी कुटुंबिय आणि खास मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा केला. आता शोभिताने पहिल्यांदा साखरपुडा आणि लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

नागाचैतन्यसोबत गुपचूप साखरपुडा करण्याचं नेमकं कारण काय? 

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या. आता अलिकडे नागाचैतन्यसोबतच्या नात्यावर शोभिताने प्रतिक्रिया दिली आहे. नागा चैतन्यसोबत साखरपुडा आणि लग्नाबाबत तिने तिची भूमिका मांडली आहे. याशिवाय मातृत्व आणि इतर विषयावरही शोभिताने चर्चा केली आहे.

नागा चैतन्यसोबत लग्नाआधी शोभिताची प्रेग्नेंसीबाबत प्रतिक्रिया

नुकत्याच एका मुलाखतीत शोभिता धुलिपालाने नागा चैतन्यसोबत तिच्या नात्याबाबत मोकळेपणाने चर्चा केली आहे. यावेळी शोभिताने सांगितलं की, तिने नेहमीच आई बनण्याचं स्वप्न पाहिलं आहे. शोभिताने तिचा साखरपुडा सामान्य नसल्याचं म्हटलं आहे. शोभिताने सांगितलं की, "8 ऑगस्टच्या दिवसाला कोणत्याही सुशोभनाची गरज नाही. मी खूप अपेक्षा किंवा स्वप्ने घेऊन त्या क्षणात जगत नव्हते. मला वाटलं की, तो क्षण खूप आरामदायक, साधा, गोड, जिव्हाळ्याचा आणि उबदार होता. मी कल्पना केली होती, तसंच सर्व काही होतं. म्हणून मी विचार केला नाही की, हा क्षण सामान्य आहे की नाही. जे व्हाययचं होतं, तेच झालं."

लग्न करण्याचं आणि आई होण्याचं स्वप्न

शोभितानेही सांगितलं की, तिने नेहमीच लग्न करण्याचं आणि आई होण्याचं स्वप्न पाहिलं आहे. ती म्हणाली, "मला नेहमीच वाटायचं की, मला मातृत्वाचा पूर्ण अनुभव हवा आहे. मी त्याबद्दल अगदी स्पष्ट होते आणि मला लग्न करण्याची इच्छा देखील होती. मला नेहमीच असे खास क्षण हवे होते की, तेलुगु संस्कृतीचा समावेश करावा. मी खूप कनेक्टेड आहे. माझी मुळे, माझ्या परंपरा, माझ्या पालकांसाठी या गोष्टी आहेत, ज्यांचे मी स्वप्न पाहिले आहे." 

8 ऑगस्ट रोजी शोभिता आणि नागा चैतन्यचा साखरपुडा

शोभिता आणि नागा चैतन्य यांनी 8 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये एंगेजमेंट केली होती आणि त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यांच्या साखरपुडा सोहळ्याला फक्त त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. जोडप्याने त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केल्यानंतर काहींनी त्यांना शुभेच्छा दिल्या, तर सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. समंथाच्या चाहत्यांनी नागा चैतन्यवर फसवणूक केल्याचा आरोपही केला.

View this post on Instagram
 
A post shared by Sobhita (@sobhitad)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

OTT Web Series : या वेब सीरीजमध्ये इंटिमेट सीन्सचा भडीमार, पाहण्यापूर्वी हेडफोन नक्की वापरा नाहीतर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 8 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaMVA Leaders meets CM Fadanavis : विधानसभा उपाध्यक्ष , विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :9 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Embed widget