एक्स्प्लोर

Munjya Box Office Collection Day 21: 'कल्की 2898 एडी'मुळे बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरलं! 21 व्या दिवशी कोटींच्या कमाईला ब्रेक

Munjya Box Office Collection Day 21 : रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने चांगली कमाई केली होती. मात्र, गुरुवारी रिलीज झालेल्या 'कल्की 2898 एडी'मुळे मुंज्याच्या कोटींच्या कमाईला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

Munjya Box Office Collection Day 21:   आदित्य सरपोतदार (Adiytya Sarpotdar) दिग्दर्शित, शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभय वर्मा (Abhay Varma) यांची मु्ख्य भूमिका असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'ने (Munjya)  रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर पकड मिळवली होती. रिलीज पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने आपले बजेट वसूल केले होते. रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने चांगली कमाई केली होती. मात्र, गुरुवारी रिलीज झालेल्या 'कल्की 2898 एडी'मुळे मुंज्याच्या कोटींच्या कमाईला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. मुंज्याने 20 व्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर 90 कोटींहून अधिक कमाई केली होती. 

'मुंज्या'ने रिलीजच्या 21 दिवशी किती केली कमाई?

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हॉरर कॉमेडी 'मुंज्या' चित्रपटगृहात रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास तीन आठवडे उलटून गेले आहेत. तरीही या चित्रपटाची क्रेझ दिसून आली. यादरम्यान 'मुंज्या'ने आपल्या बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे.

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर 'मुंज्या'ने पहिल्या दिवशी 4 कोटींची कमाई केली होती. यानंतर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 35.3 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या आठवड्यात  ‘मुंज्या’ने 32.65  कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या शुक्रवारी 3 कोटी रुपये, तिसऱ्या शनिवारी 5.5 कोटी रुपये, तिसऱ्या रविवारी 6.85 कोटी रुपये, तिसऱ्या सोमवारी 2.25 कोटी रुपये, तिसऱ्या मंगळवारी 2.25 कोटी रुपये कमावले आहेत. तिसऱ्या बुधवारी 2.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या गुरुवारच्या म्हणजेच 21 व्या दिवशीच्या कमाईची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे.

'सॅकनिल्क'च्या (Sacknilk) सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'मुंज्या' ने रिलीजच्या 21 व्या दिवशी 75 लाख रुपये कमवले आहेत. यासह 'मुंज्या'ने रिलीजच्या 21 दिवसांत 90.80 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. 

 ‘कल्कि 2898 एडी’ चा 'मुंज्या'ला फटका बसणार?

प्रभास-दीपिकाचा कल्की 2898 एडी हा 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची सध्या प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे बंपर ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी 'कल्की' रिलीज झाल्याने 'मुंज्या'च्या कमाईला धक्का बसला आहे. 'मुंज्या'साठी या वीकेंड महत्त्वाचा आहे.  कल्की 2898 एडी या चित्रपटाचे मोठं आव्हान मुंज्या समोर असणार आहे. त्यामुळे आता या आठवड्यात लो बजेट असलेला 'मुंज्या' बिग बजेट 'कल्की 2898 एडी'ला कशी टक्कर देणार याकडे लक्ष लागले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBeed Firing :  मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची डोक्यात गोळी झाडून हत्या ABP MajhaMajha Vittal Majhi Wari EP 02 | पुण्यात तुकोबांची पालखी! माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaMaharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
मोठी बातमी: भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले, लहान मुलं-महिलांचा समावेश, शोधकार्य सुरु
मोठी बातमी: भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले, लहान मुलं-महिलांचा समावेश, शोधकार्य सुरु
Embed widget