एक्स्प्लोर

मुंबईतील पहिलं जुळं चित्रपटगृह 'गंगा-जमुना'वर हातोडा पडणार

मुंबईतील गंगा जमुना चित्रपटगृहाची इमारत पालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक ठरवली आहे. ही इमारत तात्काळ पाडून टाकण्यासाठी नोटीसही धाडण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईतील पहिलं वहिलं जुळं थिएटर म्हणून ख्याती असलेलं ताडदेवमधील 'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या संरचनात्मक सर्वेक्षणात ही वास्तू अतिधोकादायक असल्याचं आढळलं आहे. गंगा जमुना चित्रपटगृहाची इमारत पालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक ठरवली आहे. ही इमारत तात्काळ पाडून टाकण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत नोटीसही धाडण्यात आली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून हे चित्रपटगृह बंद अवस्थेत असलं तरी ताडदेव सर्कल परिसराची ओळख 'गंगा-जमुना' अशीच आजही आहे. मुंबईत आजही अनेक ठिकाणी जुळी किंवा तिळी चित्रपटगृहं आहेत. त्यांची सुरुवात गंगा जमुनामुळे झाली होती. त्याकाळात वातानुकूलित असलेल्या या चित्रपटगृहाची सुरुवात 'हरे रामा हरे कृष्णा' या सुप्रसिद्ध चित्रपटापासून  झाली. त्यानंतर सुहाग, मिस्टर नटवरलाल, कालिचरण हे चित्रपट खूप गाजले. गंगा जमुनामध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी रौप्य महोत्सवी आठवडे अनुभवले, काही चित्रपट तर 50 आठवड्यांहून अधिक काळ गाजले. 'जान हाजीर है' हा चित्रपट तब्बल 75 आठवडे जमुनामध्ये चालला होता. सत्तरच्या दशकात मुंबईत मोठ्या चित्रपटगृहांच्या यादीत गंगा जमुनाचा समावेश होता. 2008 साली या चित्रपटगृहाची पुनर्बांधणी करण्यात येणार होती. त्यासाठी जो आराखडा तयार करण्यात आला होता, त्याला पालिकेने मंजुरीही दिली होती. मात्र त्याचं पुढे काहीच न झाल्यामुळे ही वास्तू गेली पंधरा वर्षे नुसतीच उभी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
Aamir Khan Third Marriage Controversy: 'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Ramayana Trailer Gets U Certificate: 4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget