एक्स्प्लोर

Ramayana Trailer Gets U Certificate: 4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट

Ramayana Trailer Gets U Certificate: 'रामायणम'च्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत दोन ट्रेलर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ramayana Trailer Gets U Certificate: नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित 'रामायण' (Ramayanam) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यास आता काहीच दिवस उरलेत आणि चाहते त्याबद्दल प्रचंड उत्सुक आहेत. 15 जुलै रोजी, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं (CBFC) या ट्रेलरला मंजुरी देत ​​'U' प्रमाणपत्र दिलंय. सिनेमाच्या प्रदर्शनाला अजून तीन महिन्यांहून अधिक कालावधी बाकी असल्यानं, अनेकांना वाटू शकतं की, हा ट्रेलर एखादा छोटासा 'प्रोमो' असेल, जो साधारणपणे अडीच किंवा तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधीचा असतो. पण, तसं नाही, हा ट्रेलर 4 मिनिटं 15 सेकंदांचा असणार आहे. 

CBFC च्या संकेतस्थळावर 'रामायणम' ट्रेलरच्या दोन एन्ट्री दिसून येतात. एक 'Trailer - Ramayan 3D' आणि दुसरी 'Theatrical Trailer - Ramayan 3D'. पहिल्या ट्रेलरचा कालावधी 4 मिनिटं 15 सेकंदांचा आहे, तर दुसऱ्याचा कालावधी 4 मिनिटांचा आहे. आता यापैकी कोणतंच वर्जन डिजिटल स्वरूपात प्रदर्शित केली जाईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

'रामायणम'च्या निर्मात्यांनी सादर केलेली ही तिसरी झलक आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 3 जुलै रोजी सिनेमाची एक इंट्रोडक्टरी क्लिप प्रदर्शित करण्यात आली होती. या वर्षी हनुमान जयंतीच्या (2 एप्रिल) निमित्तानं, निर्मात्यांनी 'राम' नावाचा टीझर रिलीज केलेला, ज्यामध्ये रणबीर कपूरनं साकारलेल्या प्रभू श्रीरामांच्या रूपावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. 2 मिनिटं 38 सेकंदांच्या या 'राम' टीझरला 'यू' (U) प्रमाणपत्रही मिळालं होतं. आता सर्वजण या सिनेमाच्या ट्रेलरची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

View this post on Instagram
 
'रामायणम'मध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या, साई पल्लवी सीतेच्या, यश रावणाच्या, सनी देओल हनुमानजींच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन 'दंगल' (2016) साठी ओळखले जाणारे नितेश तिवारी करत आहेत आणि निर्मिती नमित मल्होत्रा ​​करत आहेत. सिनेमाचं संगीत ए. आर. रहमान आणि हॅन्स झिमर यांनी दिलंय. हा सिनेमा दोन भागांत प्रदर्शित केला जाईल. पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. या सिनेमाचं बजेट 4000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

4000 Crore Ramayana Scene Leaked: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निष्काळजीपणा? सिनेमातला महत्त्वाचा सीन लीक झाल्यानं खळबळ, VIDEO

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget