एक्स्प्लोर

Aamir Khan Third Marriage Controversy: 'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य

Aamir Khan Third Marriage Controversy: आमिर खान एक अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहे, ज्यानं आयुष्यात अनेकदा प्रेमभंग अनुभवलाय. तसेच, प्रसिद्ध अभिनेत्यानं आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक महत्त्वाचे खुलासे केलेत. 

Aamir Khan Third Marriage Controversy: सध्या बॉलिवूडचा (Bollywood News) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' (Mr. Perfectionist) म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यासाठी कारण ठरतंय, त्याचं तिसरं लग्न. आमिर खाननं नुकतंच त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्यासोबत लग्न केलंय. साठीच्या आमिर खानचं (Aamir Khan Third Marriage) हे तिसरं लग्न आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे, गौरीसोबतचं लग्न हे आमिर खानचं तिसरं लग्न असून यापूर्वी त्याची दोन लग्न होऊन घटस्फोट झालेत. तसेच, त्याला आधीच्या लग्नापासून तीन मुलं आहेत. त्यात गौरी स्प्रॅटचंही आमिरसोबत केलेलं लग्न दुसरं लग्न असून आधीच्या लग्नापासून तिला एक मुलगा आहे. अशातच आता आमिर खानच्या लग्नाला लव्ह जिहादचा रंग चढवला जातोय. तसेच, अनेकांनी त्याला 'लव्ह जिहादचा ब्रँड अॅम्बेसिडर', असंही संबोधलं आहे. अशातच आपल्या लग्नावरुन आमिर खान वादाच्या भोवऱ्यात अडकला असतानाच आता त्याची पाठराखण करायला त्याचा मित्र आणि प्रसिद्ध अभिनेता पुढे सरसावला आहे. आमिर खान एक अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहे, ज्यानं आयुष्यात अनेकदा प्रेमभंग अनुभवलाय. तसेच, प्रसिद्ध अभिनेत्यानं आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक महत्त्वाचे खुलासे केलेत. 

"आमिर खानला रडताना पाहिलंय..." (Amin Hajee On Aamir Khan)

'रेडिफ'शी बोलताना प्रसिद्ध अभिनेता अमीन हाजी (Amin Hajee) आमिर खानबाबत बोलताना म्हणालाय की, "जर लोक आमिर खानला पुन्हा मिळालेल्या प्रेमाची खिल्ली उडवत असतील, तर या 61 वर्षांच्या अभिनेत्याचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत वेदना, अश्रू आणि कठीण प्रसंगांनी भरलेलं आहे, जे कित्येकांना दिसत नाही..."

'रेडिफ'ला दिलेल्या मुलाखतीत अमीन हाजी म्हणाला की, "इतक्या काळानंतर त्याला पुन्हा प्रेम मिळालंय आणि लोक विनोद करतायत, पण 15 वर्षे हा खूप मोठा काळ आहे. मी त्याचा खचलेलं पाहिलंय, मी त्याला रडताना पाहिलंय... बाहेरच्या लोकांना वाटतात तितके नातेसंबंध साधे-सोपे नसतात आणि एखादं लग्न मोडण्यासाठी केवळ एकच व्यक्ती जबाबदार असते, असं माननं चुकीचं आहे..."

"आमिर खान आपल्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित..." (Aamir Khan Marriage Controversy)

अमीन हाजी आमिर खानबाबत बोलताना म्हणाला की, "खरं तर, आमीर आपल्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित आहे. तो जे काही करतो, ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि जिद्दीनं करतो. अशा समर्पणाची एक किंमतही मोजावी लागते. जो व्यक्ती आपल्या कामात पूर्णपणे मग्न असतो, त्याच्यासोबत असताना समोरच्या व्यक्तीला कधीकधी दुर्लक्षित झाल्यासारखं वाटू शकतं..."

"त्यानं त्याच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यात..."

विवाहाबाबतचा आमिरचा दृष्टिकोन आणि त्याच्या घटस्फोटीत पत्नी, मुलांशी असलेले त्याचे संबंध यांवर बोलताना अमीन हाजी म्हणाला की, "अनेकदा नातं संपल्यानंतर लोकांच्या मनात कटुता निर्माण होते, पण आमिर खान तसा नाही. त्यानं नेहमीच विवाहसंस्थेचा आदर केलाय... आयुष्यात जेव्हा जेव्हा तो पुढे गेलाय, तेव्हा त्यानं ते जबाबदारीनंच सावरलंय. आपलं पूर्वीचं कुटुंब आणि मुलं यांची योग्य ती काळजी घेतली जाईल, याची त्यानं नेहमीच खबरदारी घेतलीय. फार कमी लोकांना ही गोष्ट समजते..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Om Puri Wife Seema Kapoor Revealed Husbands Affair: 'ओम पुरींचे घरातल्याच मोलकरणीसोबतच संबंध...'; घटस्फोटीत पत्नीचा धक्कादायक दावा, अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर्सबाबतही खुलासा
'ओम पुरींचे घरातल्याच मोलकरणीसोबतच संबंध...'; घटस्फोटीत पत्नीचा धक्कादायक दावा, अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर्सबाबतही खुलासा
Sunny Deol On Pakistan: 'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
Shalmali Kholgade On Marriage With Farhan Shaikh: शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Embed widget