एक्स्प्लोर

Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 

Re-NEET UG 2026 Result: NTA ने Re-NEET UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 11.21 लाख उमेदवार पास झाले आहेत. 

नवी दिल्ली : NEET UG 2026 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं  Re-NEET 2026 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार त्यांचं स्कोअर कार्ड अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर पाहू शकतात.  नीट पेपरफुटीमुळं मुख्य परीक्षा रद्द करावी लागली होती.त्यानंतर पुन्हा एकदा नीट यूजी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. फेरपरीक्षा 21 जून 2026 ला आयोजित करण्यात आली होती.  आता नीट यूजी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु होईल.

11.21 लाख उमेदवार यशस्वी

नीट यूजी परीक्षा 20 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती त्यापैकी 11.21 लाख विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. म्हणजेच पेपर लीक, परीक्षा रद्द होणे त्यानंतर पुन्हा परीक्षा घेण्यात आल्यानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येनं उत्तीर्ण झाले आहेत.  

पंजाब आणि हरियाणाचे विद्यार्थी टॉपवर  

यंदा पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर राहिले, दोघांनी 720 पैकी 715 गुण मिळवले.  

निकालातील  प्रमुख मुद्दे

19  उमेदवारांना 700 पेक्षा जास्त गुण
138 उमेदवारांना 690 पेक्षा जास्त गुण
1492 उमेदवारांना 650 पेक्षा जास्त गुण
10160 उमेदवारांनाने 600 पेक्षा जास्त गुण

मुलींची कामगिरी

यावेळी 56.8 टक्के महिला म्हणजेच विद्यार्थिनी पात्रठरल्यात. 55.1 टक्के विद्यार्थी पात्र ठरलेत. 690 हून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमद्ये 93 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी पहिल्यांदा परीक्षा देणारे आहेत.

देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील विद्यार्थी नीट फेरपरीक्षा पास झाले आहेत. उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 1.7 लाखांहून अधिक विद्यार्थी पास झाले आहेत. लक्षद्वीपमधून 43 उमेदवार पात्र ठरले आहेत.  नीट फेरपरीक्षेचं आयोजनं 13 भाषांमध्ये करण्यात आलं होतं. यामध्ये   हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगु, मराठी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, उडिया, पंजाबी, आसामी आणि उर्दू भाषेचा समावेश आहे.  

पुढे काय?

आता एमीबीबीएस आणि बीडीएसच्या ऑल इंडिया कोटा काऊन्सिलिंग कमिटीकडून करण्यात येईल. राज्याचा कोटा काऊन्सिलिंग राज्य सरकारे आयोजित करतील. विद्यार्थ्यांनी खोटे कॉल, प्रवेश देण्याचं आमिष यापासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget