(Source: ECI/ABP News/ABP Majha)
OTT Release in February Second Week: काजोलचा 'सलाम वेंकी' ते शाहिदचा फर्जी; या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार धमाकेदार सिनेमे अन् वेब सीरिज
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात काही चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर (OTT) रिलीज होणार आहेत.
OTT Release in February Second Week: ओटीटी (OTT) प्लेटफॉर्मवरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज आणि (Web Series) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. 2023 च्या सुरुवातीला अनेक वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. 2023 च्या सुरुवातीला रिलीज झालेल्या वेब सीरिज अनेकांनी बिंच वॉच केल्या. आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात देखील काही चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहेत.
फर्जी (Farzi)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर हा 'फर्जी' या वेब सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सीरिजमध्ये शाहिद हा सनी नावाच्या कलाकरांची भूमिका साकारणार आहे. या वेब सीरिजमध्ये शाहिदसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय सेतुपती आणि अभिनेत्री राशी खन्ना मुख्य भूमिका साकारण आहेत. 'फर्जी' ही वेब सीरिज 10 फेब्रुवारीला Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
‘सलाम वेंकी’(Salaam Venky)
काजोलचा ‘सलाम वेंकी’ (Salaam Venkey) हा चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात काजोलसोबतच विशाल जेठवा (Vishal Jethwa), राजीव खंडेलवाल, प्रकाश राज आणि अहना कुमरा यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
थुनिवु (Thunivu)
साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अजीत कुमारचा 'थुनिवु' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅफॉर्मवर 8 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अजीत कुमारचा अॅक्शन पॅक परफॉर्मन्स बघता येणार आहे.
यॉर प्लेस ऑर माइन (Your place Or Mine)
रोमान्स आणि कॉमेडिचा तडका असणारा 'यॉर प्लेस ऑर माइन' हा चित्रपट 10 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
लव शादी ड्रामा (Love Shadi Drama)
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हंसिका मोटवानीचा आणि सोहेल कथूरिया यांचा लग्नसोहळा पार पडला. हा लग्नसोहळा लव शादी ड्रामा या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना बघता येणार आहे. ही सीरिज 10 फेब्रुवारी रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रिम होणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Ghoda Trailer : कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट सांगणारा 'घोडा'; ट्रेलर आऊट