एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मिस यू मिस्टर Review : यू मिस्ड इट मिस्टर!!

'मिस यू मिस्टर' सिनेमाचा ट्रेलर आला आणि सिनेमाच्या अपेक्षा वाढल्या. कारण हा सिनेमा आज घराघरांत घडतो आहे. करिअर घडवण्यासाठी एकमेकांवर विश्वास दाखवून नवरा-बायको लाँग डिस्टन्स रिलेशनशिपचा पर्याय निवडताना दिसतात. अशा जोडप्यांची ही गोष्ट असेल असे वाटले होते.

समीर जोशी दिग्दर्शित 'मिस यू मिस्टर' सिनेमाचा ट्रेलर आला आणि सिनेमाच्या अपेक्षा वाढल्या. कारण हा सिनेमा आज घराघरांत घडतो आहे. करिअर घडवण्यासाठी एकमेकांवर विश्वास दाखवून नवरा-बायको लाँग डिस्टन्स रिलेशनशिपचा पर्याय निवडताना दिसतात. मग अशा अंतरात काय होतं? नाती कशी बदलतात? एकमेकांबद्दलचं प्रेम, आपुलकी, राग, उणीव हे कसं व्यक्त होतं? या सगळ्यांचा हा सिनेमा बनला असेल असं मनोमन वाटू लागतं. पण सिनेमा सुरु होतो. आपल्या वेगाने जाऊ लागतो. पण तो जाताना त्यात येणाऱ्या अडचणी. त्यातले प्रसंग पाहता हा चित्रपट लॉंग डिस्टन्स रिलोशनशिपवर बेतलेला नसून सामान्य नवराबायकोत असलेल्या संवादाच्या गॅपवर बेतला आहे की काय असं वाटतं. समीर जोशी यांनी यापूर्वी मंगलाष्टक वन्स मोअर, बसस्टॉप, मामाच्या गावाला जाऊया असे सिनेमे केले आहेत. आता त्यांचा हा नवा सिनेमा. सिद्धार्थ चांदेकर-मृण्मयी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात सविता प्रभूणे, राजन भिसे, राधिका हर्षे, अविनाश नारकर यांच्याही भूमिका आहेत. सिनेमाचं कलादिग्दर्शन, संगीत, पार्श्वसंगीत नेटकं आहे. गोष्ट अशी, कावेरी आणि वरुण यांची ही गोष्ट आहे. लग्न झाल्यानंतर काही महिन्यात वरुणला परिस्थितीमुळे लंडनला जावं लागतं. हा काळ 18 महिन्यांचा असतो. कावेरीचा निरोप घेऊन वरुण लंडनला जातो. दोघेही एकमेकांना विश्वासात घेतात. काही महिने उलटतात आणि मग कुरबुरी सुरु होतात. इकडे कावेरी आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहत आहे. तिचं माहेरही त्याच शहरात आहे. काही काळाने कुरबुरी सुरु होतात. समज गैरसमज मूळ धरू लागतात. त्या नात्यांचं पुढे काय होतं. हे अतंर कमी होतं की वाढतं? याचा हा सिनेमा आहे. एकमेकांपासून दूर असल्यामुळे येणारी उणीव, पझेसिव्हनेस यावरून सिनेमातले प्रसंग तयार व्हायला हवे होते असं वाटतं. ते न झाल्यामुळे जाणूनबुजून वाद होतील असे प्रसंग यात घातले गेल्याचं दिसतं. त्याामुळे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप न उरता हा नवरा-बायको यांच्यातला वाद म्हणून उरतो. अर्थात सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे यांनी खूपच चांगली कामं केली आहेत. यातून दोघांमधलं ट्युनिंग खूपच चांगलं जमलं आहे. त्याला इतर कलाकारांनी चांगली साथ दिली आहे. पटकथेत येणाऱ्या अनाकलनीय वळणांमुळे चित्रपटाची धार कमी होते. आज स्काईप, व्हीडिओ कॉल सगळं उपलब्ध असताना, वरुणचं दहा महिन्यांपासून आईला फोन न करणं पटत नाही. त्यात आई खूपच व्हॉटसअपसॅव्ही असताना. वरूण आधी 18 महिने लंडनला गेला असता त्याचा करार वाढतो. पण तो ते आपल्या बायकोला का सांगत नाही तेही कळत नाही. मग एक दिवस तिला हे कळल्यानंतर व्हायचा तो स्फोट होतो. या प्रकारामुळे ही गोष्ट लॉंग डिस्टन्सची उरत नाही. पिक्चर बिक्चरमध्ये मिस यू मिस्टर चित्रपटाला मिळताहेत दोन स्टार्स. कथाबीज चांगलं असूनही त्याची पटकथा, त्यातले प्रसंग अधिक गुंतागुंतीचे असते तर या गोष्टी सहज झाल्या असत्या असं वाटून जातं. मृण्मयी-सिद्धार्थची केमिस्ट्री पाहायची असेल तर हा सिनेमा पाहायला हरकत नाही. चित्रपटाचा ट्रेलर पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget