एक्स्प्लोर
रिव्ह्यू : होम स्वीट होम
संवाद आणि आशय चांगला असल्यामुळे हा सगळा संवाद आपल्या घरातला वाटतो.
आपलं घर प्रत्येकाला प्रिय असतं. घर म्हणजे फक्त भिंती नसून त्याच्या असण्याच्या पाऊलखुणा आपल्या जगण्याशी बांधलेल्या असतात. नेमका हाच विषय घेऊन अभिनेता, दिग्दर्शक, लेखक हृषिकेश जोशी याने नवा सिनेमा बनवला आहे. हा चित्रपट म्हणजे, त्याचं दिग्दर्शकीय पदार्पण. हृषिकेश जोशी याचा पहिला सिनेमा म्हणून या सिनेमाची उत्सुकता आहेच. पण त्यासोबत अभिनेत्री रिमा यांचा हा शेवटचा चित्रपट असल्यामुळे या सिनेमाला एक वेगळी किनार लाभली आहे. मोहन जोशी, रिमा, सुमित राघवन, स्पृहा जोशी यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट एक घरंदाज अनुभव देतो हे नक्की.
या चित्रपटाचं कथानक समजायला सोपं आहे. महाजन कुटुंबिय दादरच्या घरात जवळपास 35 वर्षं राहतात. सहज म्हणून कळता कळता त्यांच्या राहत्या घराची किंमत साडेतीन कोटी असल्याचं त्यांना कळतं. त्यानंतर सौ. महाजनांच्या मनात नवे विचार येऊ लागतात. त्या नव्या विचारांची ही गोष्ट आहे. याच्यामध्ये नाती येतात. त्यामुळे मतं-मतांतरं येतात. आणि घराबद्दलची आपआपली कन्सेप्ट उघड होऊ लागते. बदललेला काळ.. त्यात घराकडे बघण्याचा बदलत जाणारा दृष्टिकोन अधोरेखित होत जातो.
कलाकारांनी केलेल्या अभिनयामुळे हा चित्रपट जिवंत होतो. मोहन जोशी, रिमा यांच्या सहज अभिनयाला दाद द्यायलाच हवी. चित्रपटात येणाऱ्या काही गोष्टींमुळे मात्र त्याचा वेग मंदावतो. चित्रपटाची टायटल्स कमाल झाली आहेत. ती कविताही सोपी छान झाली आहे. पण उत्तरार्धात येणाऱ्या कविता मात्र आशयाने छान असल्या तरी सिनेमात त्यांचं नंतर येणं काहीसं बोजड होतं आणि त्यामुळे सिनेमालाही साचलेपण येऊ लागतं. चित्रपटाची गोष्ट उबदार असली तरी सिनेमासाठी आवश्यक असणारी घडणावळ त्यात नाही. त्यामुळे सिनेमा शब्दबंबाळ होतो. एक नक्की, यातले संवाद आणि आशय चांगला असल्यामुळे हा सगळा संवाद आपल्या घरातला वाटतो.
एकूणात, हा चित्रपट घरातला आहे. प्रत्येकाने पाहावा असा झाला आहे. एकदा पाहायला हरकत नाही. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत 3 स्टार्स. हा चित्रपट थिएटरमधे जाऊन नक्की पहा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement