Mouni Roy Wedding : मौनी रॉय लवकरच अडकणार लग्नबंधनात, समंथा-नागा चैतन्यशी लग्नाचं खास कनेक्शन!
Mouni Roy Wedding Update : 2019 मध्ये, मौनी आणि सूरज (Suraj Nambiar) नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये पहिल्यांदा भेटले होते. दुबईतील एका नाईट क्लबमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.
Mouni Roy Wedding : ‘नागिन’ फेम अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिचा दीर्घकालीन बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar) लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मौनी आणि सूरजच्या लग्नाला आता फक्त सहा दिवस उरले आहेत. या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोव्यातील आलिशान डब्ल्यू हॉटेलमध्ये मौनी आणि सूरज सात फेरे घेणार असल्याचे कळते आहे.
योगायोग म्हणजे ‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांचे लग्नही याच हॉटेलमध्ये झाले होते. मात्र, आता दोघेही वेगळे झाले आहेत. 2017 मध्ये नागा आणि समंथा याच हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकले होते. रिपोर्ट्सनुसार, मौनी रॉय (Mouni Roy) आणि सूरज नांबियार लग्नानंतर कूचबिहारमध्ये रिसेप्शन आयोजित करणार आहेत.
2019 मध्ये, मौनी आणि सूरज (Suraj Nambiar) नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये पहिल्यांदा भेटले होते. दुबईतील एका नाईट क्लबमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. असे म्हटले जाते की, पहिल्याच भेटीत सूरज नांबियार मौनी रॉयच्या प्रेमात पडला होता. सूरजची आई रेणुका आणि वडील राजा यांच्याशीही मौनीचे चांगले संबंध आहेत. रिपोर्टनुसार, मौनी रॉय 27 जानेवारीला (Mouni Roy Wedding Date) लग्नबंधनात अडकणार आहे. 23 जानेवारीपासून मौनीच्या लग्नाचे विधी सुरू होणार असून, ते 27 जानेवारीपर्यंत चालणार आहेत.
दोघांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मात्र, अद्याप पाहुण्यांची यादी समोर आलेली नाही. मौनी रॉयने आपल्या अभिनयाच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. छोट्या पडद्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडकडे वळली. मौनी रॉयने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात मौनीला चांगलीच पसंती मिळाली होती. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मौनी लवकरच रणबीर कपूर, आलिया भट्टसह ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे.
संबंधित बातम्या
- Shahrukh khan : किंग इज बॅक! आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुख खानची पहिली पोस्ट
- Naagin 6 Promo : एकता कपूरच्या 'Naagin 6' चा प्रोमो रिलीज, मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- Happy birthday Dolly Bindra : बॉलिवूडमध्ये नेहमीच ‘साईड कॅरेक्टर’, वादांमुळे नेहमीच चर्चेत राहिलीये डॉली बिंद्रा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha