एक्स्प्लोर
Advertisement
यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर
आतापर्यंत छोटा गंधर्व, प्र. के अत्रे, दुर्गा खोटे, लक्ष्मणराव देशपांडे, ग. दि. माडगूळकर, निळू फुले, श्रीराम लागू या दिग्गजांना विष्णुदास भावे पुरस्कार देण्यात आला आहे.
सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झालाय. सांगलीत अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीने या पुरस्काराची घोषणा केलीय. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे प्रतिवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
येत्या 5 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीमती कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते सांगलीत पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 25 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
आतापर्यंत छोटा गंधर्व, प्र. के अत्रे, दुर्गा खोटे, लक्ष्मणराव देशपांडे, ग. दि. माडगूळकर, निळू फुले, श्रीराम लागू या दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
डॉ. मोहन आगाशे यांचा अल्पपरिचय
डॉ. मोहन आगाशे यांनी मराठी, हिंदीसह इतर रंगभूमींवर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. पेशाने मानसशास्त्रज्ञ असलेले डॉ. आगाशे हे पुण्यातील भॉय जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात. एप्रिल 1997 ते एप्रिल 2002 या कालखंडात डॉ. आगाशे हे FTII संस्थेचे सर्वसाधारण संचालक होते. 1996 साली नवी दिल्ली संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमीने पुरस्कार देऊन गौरवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
धाराशिव
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement