Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचं निधन; 'मर्द' चित्रपटात बिग बींसोबत शेअर केलेली स्क्रिन
Mithun Chakraborty Ex Wife Passed Away: हेलेना ल्यूक गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कुरबुरींनी त्रस्त होत्या. अशातच प्रकृती अस्वास्थामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे.
Mithun Chakraborty Ex Wife And Bollywood Actress Helena Luke Passed Away: मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या पहिल्या पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) हेलेना ल्यूक (Helena Luke) यांचं निधन झालं आहे. हेलेना यांचा मृत्यू अमेरिकेत (America) झाल्याची माहिती मिळत आहे. ही दुःखद घटना प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे. रविवार, 3 नोव्हेंबर 2024 रोजी हेलेना यांचं निधन झाल्याचंही अय्यर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, हेलेना ल्यूक गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कुरबुरींनी त्रस्त होत्या. पण, तरी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं टाळलं. हेलेना यांनी अमिताभ बच्चन यांचा गाजलेला चित्रपट 'मर्द'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. मर्दमध्ये हेलेना यांनी ब्रिटीश राणीची भूमिका साकारली होती.
फॅशन इंडस्ट्रीतील चर्चित नाव होतं, हेलेना ल्यूक
हेलेना एक भारतीय अमेरिकन अभिनेत्री होत्या. 70 च्या दशकात फॅशन जगतात त्या अत्यंत प्रसिद्ध होत्या. हेलेना यांचा जन्म 1958 मध्ये झाला होता. हेलेना यांचे वडील तुर्की आणि आई अँग्लो इंडियन ख्रिश्चन होती. त्यांनी बॉलीवूड चित्रपट तसेच गुजराती थिएटरमध्ये उल्लेखनिय काम केलं. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी सुमारे नऊ वर्ष गुजराती नाटकं केली. मात्र, चांगल्या ऑफर्स न मिळाल्यानं त्यांनी प्रादेशिक चित्रपटांत काम केलं नाही. त्यानंतर त्या काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम झळकल्या होत्या.
मिथुन आणि हेलेना पहिल्या भेटीतच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले
'मर्द' चित्रपटाव्यतिरिक्त 'आओ प्यार करें', 'दो गुलाब' आणि 'साथ साथ' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये हेलेना दिसली होती. हेलेना यांनी बॉलिवूड सुपरस्टार मिथुन चक्रवर्तीसोबत लग्न केलं होतं. अभिनेत्री सारिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती मॉडेल-अभिनेत्री हेलेना ल्यूक यांना भेटले. असं म्हटलं जातं की, दोघेही पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि त्यांनी लग्नही केलं.
हेलेना यांच्या मैत्रिणीनं करुन दिलेली मिथुन यांच्याशी ओळख
हेलेना यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 1979 मध्ये त्यांनी मिथुन यांच्यासोबत लग्न केलं. पण, चार महिन्यांतच दोघांच्या नात्यातली दरी वाढली आणि दुरावा आला. दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी मिथुन यांनी योगिता बाली यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यानंतर हेलेना अमेरिकेला निघून गेल्या. हेलेना यांचा कथित प्रियकर जावेद खान यांनी मिथुन आणि हेलेनाची ओळख करून दिली होती, असं सांगितलं जातं. दरम्यान, हेलेना आणि जावेद कॉलेजमध्ये एकत्र होते. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. जावेद यांनी हेलेना आणि मिथुनची ओळख करून दिल्याचं सांगितले जातं. मिथुन पहिल्याच भेटीत हेलेनाच्या प्रेमात पडले होते. हेलेना यांनाही मिथुन आवडले होते. यानंतर हेलेना यांनी स्वतःला जावेदपासून दूर केलं आणि मिथुनसोबत त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :