एक्स्प्लोर

Divya Bharti: कित्येक आल्या अन् गेल्या, पण 'या' दिवंगत अभिनेत्रीचा 31 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड कुणीच मोडू शकलं नाही, फक्त तीन वर्षांच्या करिअरमध्ये दिलेत 13 हिट सिनेमे

Actress 31 Year Old Record: दिवंगत अभिनेत्रीचा 31 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आजही मोडणं अशक्य, नेमकं काय केलेलं हिनं, जाणून घ्या...

Divya Bharti 31 Year Old Record No Actress Break Till Now: नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti), म्हणजे अनेकांच्या गळ्यातील ताईत. दिवंगत अभिनेत्रीनं काही दिवसांतच बॉलिवूड (Bollywood) आपल्या मुठीत घेतलं होतं. असं म्हटलं जायचं की, दिव्या भारतीला मोठ्या पडद्यावर पाहण्यात एक वेगळाच अनुभव होता. अभिनेत्रीनं आपल्या अदांनी आणि अभिनयानं अक्षरशः सर्वांना वेड लावलं होतं. पण, एका अपघातानं अनेक चाहत्यांचं मन दुखावलं होतं. एका अपघातानं वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी दिव्या भारतीनं जगाला अलविदा म्हटलं. दिव्या भारतीनं चित्रपटसृष्टीत केवंळ तीन एक वर्ष काम केलं. पण, या तीन वर्षांत तीनं बॉलिवूडवर राज्य केलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एवढ्या कमी कालावधीत दिव्या भारतीनं आपल्या नावावर विक्रम केला. दिव्याचा हा विक्रम आजही कुणीच मोडू शकलेलं नाही. आजही दिव्याचा 31 वर्षांपूर्वीचा विक्रम अतूट आहे. 

31 वर्षांनंतरी अतूट असलेला दिव्या भारतीचा विक्रम कोणता? 

बॉलीवूड अभिनेत्री दिव्या भारतीनं 'निला पन्ने' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. हा तमिळ भाषेतील चित्रपट होता. यानंतर ती व्यंकटेशसोबत एका चित्रपटातही दिसली. या चित्रपटाचं नाव होतं, 'बोब्ली राजा'. दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये हे दोन चित्रपट केल्यानंतर दिव्या भारती हिंदी चित्रपटांमध्ये आली. सुमारे तीन वर्ष तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं. या तीन वर्षांत दिव्या भारतीनं साऊथ आणि बॉलिवूडमधील 21 चित्रपटांमध्ये काम केलं. या 21 चित्रपटांपैकी 13 चित्रपट सुपरहिट ठरले. फ्लॉप ठरलेले आठ चित्रपटही बजेट वसूल करण्यात जवळपास यशस्वी ठरले.                                                                    

एका वर्षांत 12 चित्रपट, दिव्याचा अनब्रेकेबल रेकॉर्ड 

विश्वात्मा चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या दिव्या भारतीनं 1992 मध्ये 12 चित्रपट केले होते. हादेखील एक रेकॉर्ड आहे. हेच काय, ज्यावेळी दिव्याचा मृत्यू झाला, त्यावेळीसुद्धा तिच्याकडे 12 चित्रपट होते. पण, दिव्याचा अपघाती मृत्यू झाला आणि तिचे ते चित्रपट तसेच अधुरे राहिले. यापैकी काही चित्रपट श्रीदेवी, करिश्मा कपूर यांसारख्या अभिनेत्रींनी नंतर पूर्ण केलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

कार्तिक आर्यनची नवी गर्लफ्रेंड कोण? 'भूल भुलैया 3'च्या अभिनेत्याचा खुलासा, नावंही सांगितलं...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget