एक्स्प्लोर
‘मिशन इम्पॉसिबल : फॉलआऊट’चा ट्रेलर रिलीज
‘मिशन इम्पॉसिबल’ सीरीज भारतातही प्रचंड लोकप्रिय आहे.
मुंबई : इथन हंट इज बॅक...दमदार डायलॉग, धडकी भरवणारी स्टंट आणि कार-बाईकचा थरार... अभिनेता टॉम क्रुझच्या ‘मिशन इम्पॉसिबल : फॉलआऊट’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये 'मिशन इम्पॉसिबल'चं सगळ्यात धाडसी मिशन पूर्ण करण्याचं आव्हान इथन हंटसमोर असणार आहे. या सीरीजमधील सहावा सिनेमा आहे. आधीच्या सिनेमांप्रमाणेच या सिनेमातही थरार अनुभवता येणार आहे.
मिशन अत्यंत अवघड असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. मात्र इथन हंट तो, त्याच्या सिनेमात कुठलीच गोष्ट ‘इम्पॉसिबल’ नसते! बाईक, कार यांच्या कसरती, डोंगरदऱ्यातील अॅक्शन्स इत्यादीने ट्रेलर खच्चून भरला आहे. त्यामुळे पाहणारे आवाक होऊन पाहत राहतील, यात शंका नाही.
क्रिस्टोफर मॅकायर दिग्दर्शित ‘मिशन इम्पॉसिबल : फॉलआऊट’ 27 जुलैला रिलीज होणार आहे.
या सीरीजमधील हा पहिला सिनेमा आहे, जो थ्रीडीमध्ये शूट करण्यात आला आहे. या सिनेमात टॉम क्रुझसोबतच हेन्री कॅविल, सायमन पेग, रेबेक फर्ग्युसन, विंग रेम्स, शॉन हॅरिस, एंजेला बॅसेट, वॅनेसा किर्बी, मिशेल मोनाहन, एलेक बाल्डविन, वेस बेंटले आणि फ्रेजरिक शिमिट हे कलाकार दिसणार आहेत.
‘मिशन इम्पॉसिबल’ सीरीज भारतातही प्रचंड लोकप्रिय आहे. या सीरीजमध्ये अभिनेते अनिल कपूरही दिसले होते.
आधीच्या पाच सिनेमांसाठी प्रत्येकी हजार-दीड हजार कोटींचं बजेट होतं. मात्र बॉक्स ऑफिसवरही तुफान गल्ला करण्याचं मिशन इथन हंटसाठी सहज पॉसिबल असतं.
पहिल्या 12 तासात या ट्रेलरने यूट्यूबवर 2 लाख 80 हजारांच्या व्हूजचा टप्पा पार केला आहे. भारतात इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमध्येही या सिनेमाचा ट्रेलर पाहता येणार आहे.
पाहा ट्रेलर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement