एक्स्प्लोर

Mission Chulbul Singham : 'चुलबुल पांडे'च्या चाहत्यांना रोहित शेट्टीची दिवाळी भेट, 'मिशन चुलबुल सिंघम' चित्रपटाची घोषणा

Salman Khan in Mission Chulbul Singham : रोहित शेट्टीच्या सिंघम फ्रेंचायझीच्या आगामी चित्रपटात सलमान खान झळकणार आहे. रोहित शेट्टीने चाहत्यांनी दिवाळी भेट दिली आहे.

Salman Khan Rohit Shetty's Upcoming Singham Franchise : रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिंघम अगेन बॉक्स ऑफिसवर रिलीज झाली असून याला बंपर ओपनिंग मिळाली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टाटर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात चुलबुल पांडेनेही एन्ट्री घेतली आहे. सिंघम अगेनमध्ये सलमान खाने कॅमिओ करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. रोहित शेट्टीच्या कॉपल युनिव्हर्समध्ये सलमान खानला पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अशातच रोहित शेट्टीने सलमान खानच्या चाहत्यांना दिवाळी भेट दिली आहे.

सलमान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर! 

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. रोहित शेट्टीने सलमान खानसोबतच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शित कॉप युनिव्हर्सच्या आगामी चित्रपटात सलमान खान झळकणार आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम फ्रेंचायझीच्या आगामी चित्रपटात सलमान खान झळकणार आहे. रोहित शेट्टीने चाहत्यांनी दिवाळी भेट दिली आहे. सिंघम अगेन चित्रपटामध्ये 'मिशन चुलबुल सिंघम'ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चाहते फारच आनंदी आहे. 

रोहित शेट्टीची 'भाईजान'च्या चाहत्यांना दिवाळी भेट

अभिनेता सलमान खानचा वर्षभरात एकही चित्रपट रिलीज झालेला नाही. त्यामुळे सिंघम अगेनमधील त्याच्या गेस्ट एन्ट्रीसाठी चाहते खूपच उत्सुक होते. एकीकडे सलमान खानला वर्षभरानंतर मोठ्या पडद्यावर पाहताना चाहते उत्सुक असतानाचा रोहित शेट्टीने ही गूड न्यूज दिली आहे. रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या शेवटी सलमान खानच्या नव्या चित्रपटाचे संकेत आहेत. आता सल्लू भाई लवकरच रोहित शेट्टीसोबत पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे.

रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात दिसणार 'भाईजान'

दिग्दर्शिक रोहित शेट्टीच्या आगामी ॲक्शन पॅक चित्रपटात चुलबुल पांडे म्हणजे सर्वांचा आवडता अभिनेता सलमान खान दिसणार आहे. हा चित्रपपट सलमान खान आणि रोहित शेट्टी यांचा पहिला अधिकृत प्रोजेक्ट असेल. या सुपरस्टार सलमान खान आणि ॲक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी यांची जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते आता डोळे लावून बसले आहेत. 

सिंघम अगेनमध्ये मिशन चुलबुल सिंघमची घोषणा

सलमान खान आता अधिकृतपणे रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा एक भाग असेल. सलमान खान 'दबंग'मधील पोलिस 'चुलबुल पांडे'ची भूमिका पुन्हा एकदा साकारताना दिसणार आहे. सिंघम अगेनच्या पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये, चुलबुल पांडेच्या भूमिकेत सलमान खान एन्ट्री करतो आणि अजय देवगणच्या सिंघममध्ये सामील होतो. यावेळी स्क्रिनवर कॉप युनिव्हर्सच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे, या आगामी चित्रपटाचं नाव आहे, 'मिशन चुलबुल सिंघम'.

मिशन चुलबुल सिंघम लवकरच...

सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना अजय देवगण आणि सलमान खान एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. तसेच, चित्रपटांमध्ये कॅमिओ म्हणून इतर पोलिस आणण्याची शेट्टीचा रेकॉर्ड पाहता, चाहत्यांना अजय देवगण आणि सलमान खान आणि अक्षय कुमार यांना एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता 'मिशन चुलबुल सिंघम' चित्रपटाच्या अपडेट्सकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

VIDEO : सूरज चव्हाणचा हटके अंदाज; बॉलिवूड गाण्यावरील रिल्स व्हायरल; गड्याचा सोशल मीडियावर फुल्ल ऑन कल्ला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget